
कोल्हापूर : सोळा वर्षांच्या मुलीला ताप येत होता, पोटात दुखत होते. डेंगीसदृश अन्य लक्षणे होती, तिच्या प्लेटलेटस् कमी झाल्या होत्या. या मुलीला सीपीआरच्या डॉक्टरांनी तपासल्यानंतर मुलीला रक्ताचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. हिमॅटोलॉजी विभागातील डॉक्टरांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि औषधे वापरत ५० दिवसांच्या उपचारातून मुलीला रक्ताच्या कर्करोगातून मुक्त करत जीवदान दिले.
सीपीआरचे हिमॅटोलॉजिस्ट डॉ. वरुण बाफना, मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. महेंद्र बनसोडे व डॉ. अनिता परितेकर यांच्यासह वैद्यकीय पथकाने तिच्यावर उपचार केले. कर्करोग म्हटले, तो सहजपणे बरा होणे अवघड होते. यातही केमोथेरपी, रेडीएशन थेरपी या उपचारात राहावे लागते. या मुलीचे पालक सुरुवातीपासून दक्ष राहिले. प्लेटलेटस् कमी झाल्या म्हणून प्लेटलेटस् दिल्या की, होईल बरी अशा दिशेने खासगी रुग्णालयात उपचार सुरू झाले. मात्र, प्रकृतीत फरक पडला नाही. तेव्हा या मुलीला सीपीआरमध्ये आणले.
येथे रक्ताचा कर्करोग झाल्याचे आढळून आले. प्लेटलेटस्सह अन्य रक्तघटक पेशी कमी झाल्या होत्या. डॉ. बाफना यांनी रक्त पेशी व लक्षणे त्यांचे विश्लेषण करून या मुलीला ५० पिशव्या रक्त चढवले. तिच्या शरीरातील अशुद्ध रक्त पेशीच बदलल्या. त्यासोबत सूक्ष्म औषधांचा वापर करून शुद्ध रक्त पेशींना विकसित करण्यास बळ दिले अन्य औषधेही दिली. अखेर ती मुलगी कर्करोगमुक्त झाली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित यांच्या सहयोगाने सीपीआरमध्ये हिमॅटोलॉजी विभाग सुरू झाला आहे. संबंधित मुलीला रक्त कॅन्सरची लक्षणे जाणवली. उपचाराचा खर्च पाच लाखांच्या पुढे सांगितला होता. असा खर्च पेलवणे अशक्य आहे, असे पालकांना जाणवले. त्यानंतर त्यांनी मुलीला सीपीआरमध्ये दाखल केले. सीपीआरमध्ये कर्करोगावर उपचार सुविधा, रक्तपेशीतील तपासण्यांची सुविधा आधुनिक आहे. त्याचा आधार घेत मुलीवर यशस्वी उपचार झाले.’’ जनआरोग्य योजनेस अन्य योजनेचा आधार घेऊन मुलीवर पूर्ण उपचार मोफत झाले.
- डॉ. वरुण बाफना, हिमॅटोलॉजीस्ट, सीपीआर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.