Car Accident : आजऱ्याजवळ कार उलटून गोव्याची महिला जागीच ठार; शिर्डी-अक्कलकोट देवदर्शन करून परतताना अपघात, पतीसह दोन मुलेही जखमी

Car Accident : शिर्डी, अक्कलकोट येथून देवदर्शन करून गोव्याला परतताना धनगरमोळा (ता. आजरा) जवळ मोटार (Car Accident) उलटून अंकिता अजित भोसले (वय ५०, रा. ३२०, पोर्याचा वाडो, कामोलीम म्हापसा, गोवा) या जागीच ठार झाल्या.
Car Accident
Car Accidentesakal
Updated on
Summary

प्रवासादरम्यान जेवण करून ते गोव्याच्या दिशेने जात असताना धनगरमोळा येथे पहाटेच्या सुमारास चालक आशीषचा एका धोकादायक वळणावर गाडीवरील ताबा सुटला. मोटार जाहिरात फलकाला धडकून उलटली झाली.

आजरा : शिर्डी, अक्कलकोट येथून देवदर्शन करून गोव्याला परतताना धनगरमोळा (ता. आजरा) जवळ मोटार (Car Accident) उलटून अंकिता अजित भोसले (वय ५०, रा. ३२०, पोर्याचा वाडो, कामोलीम म्हापसा, गोवा) या जागीच ठार झाल्या. त्यांचे पती अजित हरिश्चंद्र भोसले (५४ ) व मुले आशीष भोसले (२९) व  अंकेश भोसले (३१) हे तिघे जण जखमी झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com