कोल्हापूर : जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाच्या विद्यमान अध्यक्षपदाचा कार्यकाल संपण्यास दीड महिने अवधी आहे. त्याआधीच अध्यक्ष बदलाच्या चर्चेने जिल्ह्याच्या राजकारणात पिंगा घातला आहे. विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे (Arun Dongle) हे आपल्या पदाचा राजीनामा देऊन शब्द पाळतील, असे चित्र आहे. दरम्यान, पुढील एक वर्षानंतर होणाऱ्या गोकुळच्या निवडणुकीत (Gokul Dudh Sangh Election) तळागाळापर्यंत जोडण्या लावणाऱ्या सक्षम संचालकांकडेच अध्यक्षपदाची धुरा देण्याचे आव्हान गोकुळच्या कारभारी नेत्यांसमोर असणार आहे.