कोल्हापूर : माजी आमदार महादेवराव महाडिक (Mahadevrao Mahadik) यांची ‘गोकुळ’वरील सत्ता खालसा करण्यासाठी ज्यांना काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील व मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी एकत्र आणले, तेच नेते आता या दोघांना कोंडीत पकडण्याच्या प्रयत्नात आहेत. ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे (Arun Dongle) यांनी नेत्यांनी सांगूनही राजीनामा न देण्यावर घेतलेली भूमिका ही त्याची पहिली पायरी असून, प्रत्यक्ष संघाच्या निवडणुकीत विधानसभा आणि लोकसभेतील उट्टे काढले जाणार आहेत. त्यात पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके, माजी खासदार प्रा. संजय मंडलिक हे निर्णायक भूमिकेत असतील.