कोल्हापूर : नेत्यांचा आदेश डावलून ‘गोकुळ’च्या अध्यक्ष पदाचा (Gokul Dudh Sangh President Election) राजीनामा न देण्याचा निर्णय घेतलेल्या अरुण डोंगळे (Arun Dongle) यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणून तो मंजूर करणेही नेत्यांसमोर मोठे आव्हान असणार आहे. चार वर्षांपूर्वी ‘गोकुळ’च्या निवडणुकीत माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या विरोधात असलेल्या, पण सध्या महायुतीसोबत असलेल्या मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif), आमदार डॉ. विनय कोरे यांची भूमिका यात महत्त्वाची असणार आहे.