esakal | गोकुळ निवडणुकीबाबत २६ एप्रिलला होणार निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

गोकुळ रणांगण; निवडणुकीबाबतचा निर्णय  एप्रिल अखेरला होणार

गोकुळ रणांगण; निवडणुकीबाबतचा निर्णय एप्रिल अखेरला होणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्वात मोठा दुध संघ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या गोकुळ दुधसंघाच्या निवडणूकीबाबत २६ एप्रिलला निर्णय होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आज जाहीर केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोकुळ संस्थेने सुप्रीम कोर्टात निवडणूक स्थगित करण्याची मागणी केली होती. त्यामुळे गोकुळ निवडणूकीचा निर्णय २६ एप्रिलला होणार आहे.

दरम्यान राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यामुळे राज्य सरकारने सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकल्या आहेत. मात्र गोकुळ वगळून राज्यातील 16 संस्थांसाठी हा आदेश काढला. राज्य शासनाने गोकुळ वगळुन निवडणुकांना स्थगिती दिल्याने संस्थांचे निवडणुक कार्यक्रम सुरू राहणार आहेत. यामुळे संघाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु ही याचिका फेटाळण्यात आली आहे.