Gokul election Kolhapur final voter list
esakal
कोल्हापूर : गोकुळ पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज अंतिम मतदार यादी जाहीर झाली. यामध्ये ५४७० पैकी ५३३२ संस्थांचा समावेश झाला आहे. उर्वरित १०७ संस्था अपात्र केल्या आहेत. कच्च्या मतदार यादीवरील सुनावणी घेण्याच्या दिवसापासून रजेवर गेलेले विभागीय उपनिबंधक (दुग्ध) देविदास मिसाळ आज हजर झाले. त्यांनीच ही यादी जाहीर (Gokul election final voter list 2026) केली.