esakal | Gokul Election: क्रॉस वोटिंगने सत्ताधारी व विरोधी गटात उत्सुकता; सर्वसाधारण गटाची मतमोजणी सुरू

बोलून बातमी शोधा

Gokul Election: क्रॉस वोटिंगने सत्ताधारी व विरोधी गटात उत्सुकता; सर्वसाधारण गटाची मतमोजणी सुरू
Gokul Election: क्रॉस वोटिंगने सत्ताधारी व विरोधी गटात उत्सुकता; सर्वसाधारण गटाची मतमोजणी सुरू
sakal_logo
By
सुनील पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकूळ) निवडणुकीत सर्वसाधारण गटाची मतमोजणी सुरू झाली अन क्रॉस वोटिंग (Gokul Cross voting kolhapur)मतांनी उत्सुकता वाढवली. सत्ताधारी व विरोधी गटात कोण विजयी होणार, याची उत्सुकता ताणली गेली आहे.

राजर्षी शाहू आघाडीचे नेतृत्त्व माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार पी. एन. पाटील व अरूण नरके करत आहेत. राजर्षी शाहू शेतकरी आघाडीची धुरा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे असून, त्यांच्या नेतृत्त्वाखालील विरोधी गटाने ( Gokul Opposition Groups Victor) चार जागांवर विजय मिळविला आहे.

Gokul election update General group counting stars kolhapur marathi news

हेही वाचा- Gokul Election: उत्कंठा वाढवणाऱ्या लढतीत शौमिका महाडिकांची बाजी तर विरोधी गटातून रेडेकर विजयी

सत्ताधारी गटाला केवळ एका जागेवर विजय मिळाला आहे. उर्वरित सोळा जागांवर कोणाचे अधिक्‍य राहणार, हा प्रश्‍न महत्त्वाचा आहे. दुपारी अडीचला सर्वसाधारण गटासाठी मतमोजणी सुरू झाल्यानंतर सुमारे चाळीस टक्के क्रॉस वोटिंग झाल्याचे स्पष्ट झाले.

सत्ताधारी व विरोधी गटांतील उमेदवारांत एकेका मतासाठी चुरस पाहायला मिळणार, याचेच आडाखे बांधले जात आहेत. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी आकडेमोड करण्यास सुरवात करत उमेदवाराला किती मते पडतील, याचा अंदाज बांधण्यास सुरवात केली. त्याचबरोबर बूथवर असणाऱ्या कार्यकर्त्यांकडे फेरीनिहाय कोणाला किती मते पडली, याची चौकशी करण्यास सुरवात केली.

Gokul election update General group counting stars kolhapur marathi news