esakal | महाडिक, घाटगे, राजू शेट्टी यांची बंद खोलीत गुप्तगू

बोलून बातमी शोधा

महाडिक, घाटगे, राजू शेट्टी यांची बंद खोलीत गुप्तगू
महाडिक, घाटगे, राजू शेट्टी यांची बंद खोलीत गुप्तगू
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शिरोळ (कोल्हापूर) : गोकुळ निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांची माजी खासदार धनंजय महाडिक व माजी आमदार संजय घाटगे यांनी भेट घेतली. दोघांनी सत्ताधारी गटास निवडणुकीत पाठिंबा द्यावा अशी विनंती केली आहे.

माजी खासदार महाडिक व माजी आमदार घाटगे यांनी शिरोळ येथे राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी बंद खोलीत काही काळ चर्चा केली. या चर्चेनंतर संघटनेचे प्रमुख शिलेदार सावकर मादनाईक, संघटनेचे तालुकाध्यक्ष राम शिंदे यांच्यासमवेतही चर्चा केली. सत्ताधारी राजश्री शाहू आघाडीने दूध उत्पादकांचे हित जोपासले आहे. यामुळे स्वाभिमानीच्या ठरावधारक मतदारानी सत्ताधारी पॅनेलच्या मागे राहावे, अशी आग्रही मागणी केली.

या पार्श्वभूमीवर सावकर मादनाईक यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता ते म्हणाले, ""बुधवारी जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली जाईल. बैठकीतील निर्णय आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांना सांगितला जाणार आहे.'' दरम्यान स्वामिनी संघटनेचा प्रमुख कार्यकर्त्यांचा, सत्ताधारी गटाकडे ओढा असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत.

Edited By- Archana Banage