
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक चर्चेचा विषय ठरली आहे. आज शुक्रवारी (30 मे 2025) दुपारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत नविद मुश्रीफ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. या निवडीपूर्वीच गोकुळच्या दारात समर्थकांचा जल्लोष सुरू झाला असून, हसन मुश्रीफ यांच्या गटाचा आत्मविश्वास स्पष्ट दिसत आहे.