
फक्त दगड-विटांच्या चार भिंती नव्हे, तर लाखो लोकांचे कष्ट, त्यांचे आशीर्वाद आणि विश्वास म्हणजे सहकार.
'दूध संकलन बंद करून सत्तातधारी मनमानी कारभार करताहेत'
कोल्हापूर : गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील दूध संस्थांना संकलन बंद करण्याचा आदेश देऊन गोकुळचे (Gokul) सत्ताधारी सत्तेचा मनमानी कारभार करत आहेत, असा आरोप गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक (shoumika mahadik) यांनी एका निवेदनाद्वारे केला आहे. निवेदनात म्हटले आहे, गडमुडशिंगीतील त्या दोन्ही संस्थांच्या प्रतिनिधींनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवून लढा देण्याचे धाडस दाखवले. अशा इतरही संस्था आहेत, ज्यांच्यावर अशाच प्रकारे अन्याय झाला आहे. (Kolhapur Politics) तेही हळूहळू समोर येतील, अशी अपेक्षा आहे. फक्त दगड-विटांच्या चार भिंती नव्हे, तर लाखो लोकांचे कष्ट, त्यांचे आशीर्वाद आणि विश्वास म्हणजे सहकार असतो. याचा विसर कदाचित गोकुळच्या सत्ताधाऱ्यांना पडला आहे. (Kolhapur News)
हेही वाचा: राज्यात थंडी वाढणार, मुंबईत पारा आणखी घसरण्याची शक्यता
संघात मनमानी कारभार आणि सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे. १८ तारखेला मला माहिती मिळाली की, गोकुळमध्ये अनधिकृतपणे काही निर्णय घेतले आहेत. हे निर्णय घेताना सहकाराचे नियम पाळले नाहीत. बुधवारी (१९) स्वतः संघात याची पडताळणी केली. संचालक या नात्याने संबंधित विषयाची माहिती अधिकाऱ्यांकडे मागितली. तेव्हा काही माहिती उपलब्धच नाही व जी उपलब्ध आहे, ती अध्यक्षांना विचारल्याशिवाय देऊ शकत नाही, अशी उत्तरे दिली. तरीही संयम ठेवून अध्यक्षांना भेटून विचारणा केली.
उद्या सकाळपर्यंत तुमच्याकडे माहिती द्यायला सांगतो, असे त्यांनी सांगितले. मेलद्वारे व लेखी पत्राद्वारे संघाकडे माहिती मागवली, मात्र सत्ताधारी व प्रशासनाकडून टाळाटाळ सुरू आहे. मंगळवार (२५) संघाची संचालक मंडळाची बैठक आहे. यात प्रश्नांची उत्तरे मिळतील.
तसेच सत्ताधाऱ्यांनी घेतलेला चुकीचा निर्णय मागे घेऊन सहकार कायद्यानुसार सर्व प्रक्रिया त्यांच्याकडून पार पाडली जाईल. अन्यथा असलेल्या सर्व पुराव्यांसह याचा खुलासा केला जाईल.
हेही वाचा: देश वाचवायचा असल्यास भाजपला सत्तेत आणावं लागेल; मुलायम सिंह यांची सून मैदानात
Web Title: Gokul Organisation Handled Stop Processing Milk Says Shoumika Mahadik
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..