कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदाच्या (Gokul President Election) निवडीत शेवटच्या क्षणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हस्तक्षेप केल्याची चर्चा आहे. फडणवीस यांनी थेट फोन करून वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना महायुतीचा अध्यक्ष करण्याच्या सूचना केल्याचे समजते. यामुळे नेत्यांचीही पंचाईत झाली असून, यापूर्वी अध्यक्षपदासाठी ठरलेले शशिकांत पाटील-चुयेकर यांचे नाव मागे पडण्याची शक्यता आहे.