राज्यभरातील सरकारी नोकरदारांच्या ग्रुपवर हा मॅसेज फिरल्याने अनेकांची तारांबळ उडाली. त्यातच बॅंकाना सार्वजनिक सुटी असल्याने मोबाईल हॅक (Mobile Hack) झालेल्यांमध्ये अस्वस्थता आहे.
कोल्हापूर : जिल्ह्यातील अनेकांच्या मोबाईलवर आज ‘मुख्यमंत्री ग्रामीण विकास योजना एपीके’ (CM Gramin Vikas Yojana) फाईल व्हॉटस्ॲपद्वारे आली. ही फाईल उघडताच अनेकांचा मोबाईल हॅक होऊन त्याचा ताबा हॅकर्सच्या हाती गेला. राज्यभरातील सरकारी नोकरदारांच्या ग्रुपवर हा मॅसेज फिरल्याने अनेकांची तारांबळ उडाली.