esakal | ढवळीतील उपसरपंचाला निवडून आल्याचा आनंद पाहता आलाच नाही

बोलून बातमी शोधा

Gram Panchayat Results  tasgaon sangli political news

तासगाव तालुक्‍यात आबा गटाची बाजी

 17 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीची सत्ता ः येळावी, कवठेएकंद सावळज येथे सत्तांतर

ढवळीतील उपसरपंचाला निवडून आल्याचा आनंद पाहता आलाच नाही

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

तासगाव (सांगली) : तासगाव तालुक्‍यातील 36 ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. त्यात आमदार गटाने 17 ग्रामपंचायती मिळवत बाजी मारली. खासदार समर्थकांनी 12 ग्रामपंचायती राखल्या. येळावी ,कवठेएकंद, सावळज, येथे धक्कादायक सत्तांतर झाले 5 ठिकाणी संयुक्त तर 2 ठिकाणी स्वतंत्र पॅनल निवडून आल्याचे स्पस्ट झाले.


तासगाव तहसीलदार कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात आज आठ वाजता मत मोजणी सुरू करण्यात आली. 36 टेबल्स वर प्रत्येकी 4 कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला टपालाची मतमोजणी केली आणि त्यानंतर दहा वाजता प्रत्यक्ष मतमोजणी सुरू झाली.
 पहिल्या फेरीत धामणी धोंडेवाडी डोरली गोटेवाडी कवठे एकंद येळावी या गावाची मतमोजणी झाली त्यामध्ये येळावी आणि कवठे एकंद येथे धक्कादायक निकाल लागले येळावी येथे 11 विरुद्ध 6 अशी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस आघाडीने सत्ता घेतली तर कवठेएकंद येथे शेकाप भाजप संयुक्त पॅनेलने राष्ट्रवादी कडून 13 विरुद्ध 4 अशी सत्ता मिळवली.

गोटेवाडी येथेही सत्तांतर होऊन राष्ट्रवादीने सत्ता हस्तगत केली. दुसऱ्या फेरीत विसापूरच्या 8 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत संयुक्त गटाचे उमेदवार निवडून आले. तर मांजर्डे येथे झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी ने 15 विरुद्ध 0 अशी पुन्हा एकहाती सत्ता पुन्हा टिकवली. आळते येथिल 8 जागांसाठी निवडणूक होऊन आबा काका गटाला प्रत्येकी 4 जागा मिळाल्या. हातणोली गौरगाव धुळगाव येथे भाजपने सत्ता कायम राखली तर दहिवडी येथे राष्ट्रवादी ने एकहाती सत्ता मिळवली.तर नागावकवठे येथे भाजप कॉंग्रेस संयुक्त पॅनेलने 6-3 असे सत्ता परिवर्तन केले.


तिसऱ्या फेरीत झालेल्या मतमोजणीत सावळज येथे राष्ट्रवादी ने भाजपकडून सत्ता खेचून घेण्यात यश मिळविले. राष्ट्रवादीचे सागर पाटील यांच्या पॅनेलला 14 जागा मिळाल्या विरोधकांना 3 जगावर समाधान मानावे लागले. निंबळक येथे उपोषण समिती पुरस्कृत ग्रामविकास पॅनेलने सत्ता मिळविली.चौथ्या फेरीत झालेल्या मतमोजणीत राजापूर येथे भाजपकडून राष्ट्रवादी ने सत्ता हस्तगत केली. तर शिरगाव येथे डॉ प्रताप पाटील यांनी सत्ता राखण्यात यश मिळवले. जरंडी येथे भाजपकडून सत्ता खेचून घेण्यात राष्ट्रवादिला यश मिळाले. गव्हाण येथे राष्ट्रवादी च्या दोन गटातच निवडणूक होऊन राष्ट्रवादी ने सत्ता घेतली. 

हेही वाचा- सिंधुदुर्गातील ९० टक्के ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्व ;  नितेश राणे

मतमोजणीच्या शेवटच्या फेरीत बोरगाव भाजपने खेचून घेतल्याचे, हातनूर मध्ये भाजपच्या मोहन पाटील यांनी सत्ता राखण्यात यश मिळवले तर पेड मध्ये 11 विरुद्ध 2 अशी सत्ता राखण्यात भाजपला यश मिळाल्याचे स्पष्ट झाले.मतमोजणी चे निकाल जसजसे जाहीर होतील तसा बाहेर कार्यकर्त्यांचा उत्साह वाढत होता फटाक्‍यांची आतषबाजी गुलालाची उधळण करत कार्यकर्ते आनंद व्यक्त करत होते.


निधन झाले, पण निवडून आले
ढवळी येथील उपसरपंच अतुल पाटील यांचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले ते निवडणुकीला उभे होते ते 333 मते मिळवून निवडून आल्याचे स्पष्ट झाले.

संपादन- अर्चना बनगे