esakal | इचलकरंजीत गुटखा तस्करीचा मार्ग बदलला
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजीत गुटखा तस्करीचा मार्ग बदलला

इचलकरंजी शहरात मोठ्या प्रमाणात कर्नाटकातून गुटखा येतो. गुटखा तस्करी करणारी मोठी यंत्रणाच कार्यरत आहे. मात्र, पंचगंगा नदीरोडवरील असलेल्या तपासणी नाक्‍यामुळे गुटखा वाहतूक करताना सतत कारवाई होत आहे. त्यामुळे गुटखा तस्करीचा मार्गच बदलला आहे. आता कबनूरमार्गे शहरात गुटखा येत आहे. दिवसभरात किमान एक लाखांचा गुटखा शहरात बेकायदेशीरपणे दाखल होत आहे. 

इचलकरंजीत गुटखा तस्करीचा मार्ग बदलला

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

इचलकरंजी : शहरात मोठ्या प्रमाणात कर्नाटकातून गुटखा येतो. गुटखा तस्करी करणारी मोठी यंत्रणाच कार्यरत आहे. मात्र, पंचगंगा नदीरोडवरील असलेल्या तपासणी नाक्‍यामुळे गुटखा वाहतूक करताना सतत कारवाई होत आहे. त्यामुळे गुटखा तस्करीचा मार्गच बदलला आहे. आता कबनूरमार्गे शहरात गुटखा येत आहे. दिवसभरात किमान एक लाखांचा गुटखा शहरात बेकायदेशीरपणे दाखल होत आहे. 

लॉकडाउनमध्ये गुटखा तस्करीला गती आली. या काळात पानपट्ट्या बंद राहिल्याने शौकिनांना गुटखा पुरविणारी यंत्रणाच उभी राहिली. कर्नाटक हद्दीतून दररोज गुटका तस्करी होत राहिली. बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीसाठी नदीरोडवर तपासणी नाका सुरू केला आहे. तेथे पालिका व पोलिस कर्मचारी तैनात आहेत. या नाक्‍यावरील कडक तपासणीमुळे सातत्याने अवैधपणे शहरात येत असलेला गुटखा साठा पकडला.

यामध्ये बोरगावमधील जावेद चोकावे याचे नाव सातत्याने पोलिस दप्तरी आले. 
सातत्याने कारवाई होत राहिल्याने गुटखा तस्करांनी आता नवा मार्ग शोधला आहे. हुपरी, पट्टणकोडोली, रुई, चंदूर, कबनूर मार्गे शहरात गुटखा साठा येत आहे. कबनूर येथील तपासणी नाक्‍यावर फारशी कडक तपासणी केली जात नाही. त्यामुळे तस्करांचे फावत आहे. दररोज किमान एक लाख रुपयांचा गुटखा शहरात अवैध मार्गाने येत आहे. कबनूरमार्गे जवाहरनगर भागात हा गुटखा जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या मार्गे होणारी गुटखा तस्करी रोखण्याचे आव्हान पोलिस यंत्रणेसमोर असणार आहे.

loading image
go to top