Raksha Bandhan 2021
Raksha Bandhan 2021esakal

Raksha Bandhan 2021 - हँडमेड राख्यांत गुंफले स्वावलंबनाचे धागे

Published on
Summary

रक्षाबंधनाच्या निमित्ताने तर काहींनी घरबसल्या हँडमेड राख्या तयार करून त्यातून स्वावलंबन गुंफले आहे.

कोल्हापूर : लॉकडाउन काळात अनेकांनी आपल्या कला कौशल्याचा वापर करून छोटे-मोठे व्यवसाय सुरू केले. रक्षाबंधनाच्या निमित्ताने तर काहींनी घरबसल्या हँडमेड राख्या तयार करून त्यातून स्वावलंबन गुंफले आहे. (Raksha Bandhan 2021) घरीच उपलब्ध असलेल्या साहित्यापासून म्हणजेच रंगीत मणी, कागद, टिकल्या, तांदूळ, रंगीत गोंडे आणि लोकरीचा धागा असे साहित्य वापरून घरच्याघरीच लाखमोलाच्या राख्या तयार केल्या. एवढेच करून त्या महिला थांबल्या नाहीत, तर सोशल मीडियाचा (social media) प्रभावी वापर करून कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचा विचार करत होम डिलिव्हरीचाही पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यापैकी काही जणांचा पर्यावरणपूरक प्रयत्न जाणून घेऊया...

क्युलिंग कागदापासून राखी

ताराबाई पार्कमध्ये राहणाऱ्या पद्मश्री मादनाईक दोन-तीन वर्षांपासून क्युलिंगपासून राख्या बनवितात. चायनीज राख्यांना पर्याय म्हणून पर्यावरणपूरक राखी कशी तयार करता येईल, असा त्यांचा प्रयत्न होता. क्युलिंग कागदापासून त्यांनी राखी बनविण्याचा प्रयत्न केला. तो यशस्वीही झाला. यात त्यांनी कलात्मकता आणत लहान मुलांना आकर्षित करणाऱ्या कार्टुन्सच्या डिझाईन्स असलेल्या राख्या बनविल्या. स्वयंसिद्धा संस्थेच्या माध्यमातून या राख्या विक्रीस ठेवल्या. या राख्यांना मोठा प्रतिसाद मिळू लागल्यानंतर ऑनलाईन माध्यमातूनही या राख्यांची विक्री सुरू ठेवली आहे.

Raksha Bandhan 2021
पंतप्रधान मोदींनी कल्याण सिंहांचे घेतले अखेरचे दर्शन

हस्तकलेच्या आवडीतून साकारल्या राख्या

संगीता सावर्डेकर यांना हस्तकलेची आवड होती. या आवडीतूनच त्यांनी सुरवातीला क्लेपासून राख्यांच्या विविध डिझाईन्स तयार केल्या. त्याला शेजारी, नातेवाईक यांच्याकडून मागणी आली. त्यामुळे थोड्या जास्त प्रमाणात राख्या बनविल्या. दिवसेंदिवस वाढती मागणी पाहून कुंदन, भैय्या-भाभी राखी, खड्यांच्या, टिकल्यांच्या तसेच विविध कार्टुन्सची डिझाईन्स असलेल्या राख्या बनविल्या. त्या राख्या घाऊक व्यापाऱ्यांकडे विक्रीसाठी ठेवल्या. गेल्या वर्षीपासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर ऑनलाईन बुकिंग घेऊन घरपोच राखी देणेही सुरू केले आहे. यंदा तर राख्यांना एवढी मागणी आहे की दोन दिवसांपूर्वीच बनविलेल्या सर्वच राख्यांची विक्री झाली आहे.

पुनर्वापर करता येणाऱ्या बनविल्या राख्या

गेल्या वर्षी कोरोनामुळे जाहीर झालेल्या लॉकडाउनमध्ये सर्वांकडेच बराच मोकळा वेळ होता. त्यामुळे रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर न्यू पॅलेस परिसरातील नैना साळोखे यांनी क्रोशा विणून राखी बनविली. त्यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला. यंदा त्यांनी एक पाऊल पुढे टाकत सुमारे सत्तर ते ऐंशी राख्या विणल्या. त्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून मार्केटिंग केले. व्हॉटस्‌ॲप व इन्स्टाग्राममधून त्याचे बुकिंग घेतले. या राखीचा पुनर्वापर करता येत असून, साडीची लेस, किल्लीचे किचन, ब्रोशा म्हणूनही त्याचा वापर करता येतो. त्यामुळे या राखीला परराज्यासह विदेशांतूनही मागणी आल्या. यातील काही राख्या अमेरिकेला कुरियरव्दारे पाठविल्या आहेत.

Raksha Bandhan 2021
१ अब्ज मुलांची होरपळ; युनिसेफच्या अहवालात निरीक्षणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com