मुश्रीफांच्या वाढदिवसाच्या पोस्टरवरुन नवा वाद, कोल्हापुरात राजकारण तापणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

hasan Mushrif

बहुजन समाजाच्या भावना दुखावणारे हे कृत्य अत्यंत असंवेदनशील आहे.

मुश्रीफांच्या वाढदिवसाच्या पोस्टरवरुन वाद, राजकारण तापणार?

राज्यामध्ये सध्या हनुमानच्या नावावरून वाद सुरु आहे. कोल्हापुरात हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसावरून रामायण सुरु झालं आहे. हसन मुश्रीफ यांच्या नावामध्ये प्रभू श्रीरामांचं नाव चित्रित केल्यामुळं नवा वाद निर्माण झाला आहे. प्रभू श्रीरामांच्या नावाबरोबर ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे नाव जोडण्याचा प्रकार झालाय तो अत्यंत निंदनीय असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे समरजीतसिंह घाटगे यांनी केली आहे. दरम्यान, बहुजन समाजाच्या भावना दुखावणारे हे कृत्य अत्यंत असंवेदनशील असून या कृत्याविरुद्ध कागल पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

यावरून आता कागलमधील राजकारणात वेगळ्या वादाला तोंड फुटणार असल्याची शक्यता आहे. ही घटना अशी की, रामनवमी दिवशी मंत्री हसन मुश्रीफ यांचाही वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त त्यांनी दिलेल्या जाहिरातीत हसन मुश्रीफ यांचे नाव आहे. या जाहिरातीला राम नवमीची डिझाइन करण्यात आली असल्याने भाजपचे नेते समरजितसिंह घाडगे यांनी यावर आक्षेप नोंदवला आहे. अशा प्रकारे राम या शब्दाची डिझाईन कशी काय करू शकता तुम्ही रामापेक्षा तुम्ही मोठे आहात का असा सवालही त्यांनी केला आहे.

हेही वाचा: दिल्लीला जाणाऱ्या विमानातील प्रवाशाच्या मोबाईलला लागली आग अन्..

दरम्यान, यात प्रभु श्रीराम यांचा एकेरी उल्लेख केला असल्याने घाटगे यांनी कागल पोलिस ठाण्यात कार्यकर्त्यांच्या मोर्चासह हसन मुश्रीफ यांच्या विरोधात तक्रार देण्याची शक्यता आहे. या जाहिरातीवरून राजकारणात गोंधळ निर्माण झाला आहे. कोल्हापूर उत्तरची निवडणुकी नुकतीच पार पडली आहे. या पार्श्वभूमीवर या वादामुळे राजकारण तापलं आहे. याशिवाय कागलमध्ये हसन मुश्रीफ आणि समरजित सिंह घाडगे यांचा राजकीय वाद प्रचंड शिगेला पोहोचला आहे.

समरजित सिंह घाडगे यांचं ट्विट, काय म्हणालेत ते यात

हेही वाचा: स्वत:ला मोठं करण्यासाठी भाजप नेत्या खालच्या थराला ;राष्ट्रवादीचा हल्लाबोल

Web Title: Hasan Mushrif Birthday Samarjeetsinh Ghatge Complaints Against Advertise Of Ramnavami

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top