esakal | वाहरे पठ्ठ्या म्हणून शाबासकी द्याल का! मुश्रीफ यांची चंद्रकांत पाटलांकडून अपेक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

hasan mushrif critisezes to chandrakant patil in event of zp office kolhapur

वाहरे पठ्ठ्या म्हणून शाबासकी द्याल का!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आजरा (कोल्हापूर): ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाषणात भाजपचे प्रदेशाध्यक्ष व माजी महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, ‘‘चंद्रकांत पाटील यांच्यासारखी खाती माझ्याकडे असती तर, नुसतेच रस्तेच केले नसते. आरशासारखे चकचकीतदेखील केले असते. त्यांना कोल्हापुरात एकही रस्ता करता आला नाही. गतविधानसभा निवडणुकीच्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दहा वर्ष आमदारकी असूनही आंबेओहळ प्रकल्प पूर्ण करू शकत नसल्याची माझ्यावर टीका केली होती; पण आता प्रकल्प पूर्ण केला आहे. त्यामुळे पाटील यांनी वाहरे पठ्ठ्या, असे म्हणून खुल्या मनाने मला शाबासकी देण्याची गरज आहे.’’

ते म्हणाले, ‘‘गाडीतून येतांना आंबेओहळबाबत श्रेयवादाचे फलक दिसले. जी मंडळी आंबेओहळ पूर्ण होऊ नये म्हणून न्यायालयात गेली. त्याच मंडळींचे हे फलक होते. भाजप शासनाच्या काळात केवळ जिल्ह्यातच नव्हे संपूर्ण राज्यात एक थेंबही पाणी अडवले गेले नाही. चंद्रकांत पाटील यांच्याकडे महसूल व बांधकाम यांसारखी खाती असतानाही विकास साधता आला नाही. विकासामुळेच लोकांच्यात नवचैतन्य येते. असे नवचैतन्य आणण्यासाठी धमक लागते.’’

पायगुणाचा चमत्कार

पाणी अडवण्यात तत्कालीन भाजपचे सरकार अपयशी ठरल्याचे सांगत आंबेओहळ प्रकल्पात पाणीसाठा झाल्याकडे भाषणात लक्ष वेधले. पायगुणाचा फरक व चमत्कार असल्याचा टोला मारताच तो नेमका भाजपवर की भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर याबाबत उपस्थितात चांगलीच चर्चा रंगली होती.

loading image
go to top