esakal | 'कोरोनापेक्षा मोदी-शहांना ममता बॅनर्जींना हरवण्यात रस'
sakal

बोलून बातमी शोधा

'कोरोनापेक्षा मोदी-शहांना ममता बॅनर्जींना हरवण्यात रस'

'कोरोनापेक्षा मोदी-शहांना ममता बॅनर्जींना हरवण्यात रस'

sakal_logo
By
सुनील पाटील

कोल्हापूर : देशात कोरोना रुग्ण वाढत आहेत. ऑक्‍सिजन, रेमडिसिव्हर व लस मिळत नसल्याने लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. तरीही, पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाला हरवण्यापेक्षा पश्‍चिम बंगालमधील निवडणूकीत ममता बॅनर्जींना हरविण्यात रस असल्याची टिका कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. भाजपने ऑक्‍सिजन, रेमडिसिव्हर व लसीवर कंट्रोल ठेवल्यामुळे कोरोनामुळे लोकांचा मृत्यू होत आहे. तसेच, रेल्वे आणि वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबाबबत केलेल्या वक्तव्य म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे. अशा गोयल यांच्या वक्तव्याचा निषेध कामगार मंत्री हसन मश्रीफ आज कोल्हापूरमध्ये केला.

मुश्रीफ म्हणाले, गोयल यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्य चुकीचे आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे केंद्र सरकासोबत समन्वय ठेवून आहेत. कोरोनासारख्या महामारीत राजकारण येवू नये, अशी मुख्यमंत्री ठाकरे यांची भूमिका आहे. पियुष गोयल यांची सत्तेची दुसरी फेरी आहे. हे देशाचे रेल्वेमंत्री आहेत. त्यांच्याकडे वाणिज्य पदाचा भार आहे. हे महाराष्ट्रातील आहेत. विज्ञावान ग्रस्थ आहेत. त्यांना ग्रामीण भागात नेऊन हे कोण विचारले तर पाच माणसांनी जरी गोयल यांना ओळखले तर मी तुम्ही द्याल ती शिक्षा भोगण्यास तयार आहे. महाष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर टिका करताना आपण राज्याचा अपमान करत आहेत. गोयल हे मुंबईचे आहेत. तरीही ते महाराष्ट्रासोबत कशाला ही संपर्क ठेवत नाही. याउलट ते राज्याचा बदनामी करत आहे.

ब्रुक फार्मावर पोलिस कारवाई झाली म्हणून देवेंद्र फडणवीस पोलिस ठाण्यात बसले आहेत. त्यांनी असले घाणेरडे राजकारण बंद करावे. सरकार अस्थिर होत नाही म्हणनूच त्यांचे हे सर्व खेळ सुरु आहेत. ऑक्‍सिजनसाठी मुख्यमंत्री प्रयत्न करत आहे. गुजरातला जास्त, मध्यप्रदेशामध्ये लस जास्त दिले जात आहे. हे राजकारण थांबवले पाहिजे असेही मुश्रीफ म्हणाले.