"एखाद्या माणसाचे वाईट करून निवडणूक जिंकता येत नाही, हे यावेळीही सिद्ध झाले."
कागल : ‘सामान्य माणूस आणि परमेश्वर पाठीशी आहे तोपर्यंत माझा पराभव शक्य नाही, हे पुन्हा सिद्ध झाले होत आहे. नियत साफ, गोरगरीब जनता आणि उपचार केलेल्या रुग्णांचा आशीर्वाद, सर्वसामान्य जनता व लाडक्या भगिनी यांनी कशालाही दाद दिली नाही. त्यामुळे हा अभूतपूर्व विजय मिळाला,’ असे प्रतिपादन नामदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केले.