कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा; आपत्ती व्यवस्थापनातील कक्षांना अलर्ट राहण्याच्या सूचना

The possibility of heavy rains till Konkan, in central Maharashtra, till Saturday
The possibility of heavy rains till Konkan, in central Maharashtra, till Saturday
Updated on: 

कोल्हापूर: जिल्ह्यात मॉन्सूनला(Monsoon)कालपासून सुरवात झाली. दुपारी आणि सायंकाळी पावसाने हजेरी लावली. उद्या (शनिवार) आणि रविवारी जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. दरम्यान आपत्ती व्यवस्थापनातील कक्षांना अलर्ट राहण्याच्या सूचना( Alerts to Disaster Management)दिल्या आहेत. तसेच अधिकाऱी-कर्मचारी यांना हेडक्वॉर्टर न सोडण्याच्या सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत.

गेली दोन दिवस मुंबई आणि कोकणात जोरदार बरसणारा मॉन्सून आज जिल्ह्यात धडकला. दुपारी आणि सायंकाळी झालेल्या जोराच्या सरींनी शहरासह ग्रामीण भागात गारवा निर्माण झाला. शेतकऱ्यांनीही नुकताच पेरणी पूर्ण केली आहे. त्यांनाही पावसाने काहीसा दिलासा मिळाला आहे. पंचगंगा नदीच्‍या राजाराम बंधाऱ्यावरील आज सायंकाळी १० फूट ४ इंच पाणी पातळी होती. शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात ठिकठिकाणी पासवाच्या सरी बरसल्या आहेत. जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात पुढील दोन दिवसांत अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे तालुक्यांतील आपत्ती व्यवस्थापन कक्षांना अलर्ट राहण्याचा सूचना दिल्या आहेत. मदत कार्यासाठी आवश्‍यक साधनसामग्री तयार ठेवली आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्षासह संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हेडक्वॉर्टर न सोडण्याच्या सुचना दिल्या आहेत.

शक्यतो घराबाहेर पडणे टाळा

मॉन्सून असल्यामुळे विजांचा कडकडाट कमी होईल; पण साधारण ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्यामुळे विजेचे खांब कोसळणे, झाडे उन्मळणे, छतावरील पत्रे उडून जाणे, धोकादायक इमारती कोसळणे असे अपघात होऊ शकतात. नागरिकांनी शक्यतो अतितातडीचे काम असल्याशिवाय बाहेर पडू नये. धोकादायक ठिकाणी थांबू नये, असेही आवाहन आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Drought, Six Talukas, District Bank Resolution
32-year-old Vikas Chougale drowned in Kasari River
Pune MLC Election, Graduate Teacher Seats,
Maharashtra sugar season
Marathi News Esakal
www.esakal.com