इ. स. पू. १५०० ते ४०० वर्षे हा महापाषाण संस्कृतीचा (मेगालिथिक कल्चर) काळ मानला जात असून, हा मानवी विकासाच्या वाटचालीतील एक महत्त्वाचा कालखंड आहे.
राजापूर : कोकणातील पहिल्या महापाषाण संस्कृतीकालीन (Megalithic Culture) एकाश्मस्तंभ स्मारकांचा शोध लावल्याचा दावा सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील पुरातत्त्व आणि कातळशिल्प संशोधक सतीश लळीत यांनी केला. राजापुरातील कुंभवडे येथील श्री गंभीरेश्वर मंदिराजवळ (Gambhireshwar Temple) जांभ्या दगडाची सात एकाश्मस्तंभ स्मारके लळीत यांनी शोधली असून, ही स्मारके म्हणजे एकाच दगडातून खोदून काढून उभे केलेले उभे पाषाण आहेत.