esakal | छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास पाठ्‌यपुस्तकातून वगळला...
sakal

बोलून बातमी शोधा

history of Chhatrapati Shivaji Raja was omitted from the textbook in karnatka government

कर्नाटक सरकारच्या निर्णयाबाबत तिव्र नाराजी....

छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास पाठ्‌यपुस्तकातून वगळला...

sakal_logo
By
मिलिंद देसाई

बेळगाव - कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर शिक्षण खात्याने अभ्यासक्रमात कपात केली आहे. मात्र अभ्यासक्रमात कपात करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासक्रमातुन वगळण्यात आला आहे. त्यामुळे मराठी भाषिकांतुन तिव्र संताप व्यक्‍त केला जात असुन जाणीवपुर्वक शिवाजी राजे व मराठा साम्राज्याचा इतिहास पाठ्‌यपुस्तकातुन वगळण्यात आल्याचे मत व्यक्‍त होत आहे. तसेच शिक्षण खात्याने पुन्हा राजांचा इतिहास पाठ्‌यपुस्तकात समाविष्ट करावा अशी मागणी होत आहे. 

कोरोनामुळे मे महिन्यात सुरु होणाऱ्या शैक्षणिक वर्षाला अधिक विलंब झाला आहे. तसेच 120 दिवसांचे शैक्षणिक वर्ष करण्याचा निर्णय घेत अभ्यासक्रमात सध्या तिस टक्‍के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र अभ्यासक्रमात कपात करताना छत्रपती शिवाजी महाराचांचे प्रशासन, छत्रपती शिवाजी महाराज यांचे उत्तराधिकारी, मराठेशाहीची स्थापना यासह महत्वाचा अभ्यासक्रम वगळण्यात आला आहे. सुरुवातीला टिपु सुलतानचा अभ्यासक्रम वगळण्यात आला होता अशी माहिती देण्यात आली होती. मात्र शिक्षण खात्याने शिवाजी राजांचा महत्वपुर्ण अभ्यासक्रम वगळण्यात आल्याबाबत आश्‍चर्य व्यक्‍त जात आहे. 

शहाजी राजांनी बेंगळुरमध्ये अनेक वर्ष राज्य कारभार केला तसेच शिवाजी राजांनी कर्नाटकात मोठा पराक्रम गाजविला असुन राजांचा इतिहास सर्वांसाठी प्रेरणादायी असुन जगातील अनेक देश शिवाजी राजांच्या युध्द नितिचा अभ्यास करीत आहेत असे असताना देखिल कर्नाटकी सरकारने मराठेशाहीचा अभ्यासक्रम वगळने चुकीचे असल्याचे मत व्यक्‍त होत आहे. 

स्वत: ला हिंदुत्ववादी म्हणुन घेणाऱ्या सरकारने अभ्यासक्रमातुन शिवाजी राजांचा इतिहास वगळला आहे यावरुन त्यांचे बेगडी प्रेम दिसुन येत आहे. शिवाजी राजांचा इतिहास आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असुन कर्नाटक सरकारचा मराठी व्देष नविन नाही आहे. त्यामुळे वगळण्यात आलेल्या अभ्यासक्रमाबाबत त्वरीत फेर विचार करावा 
- मालोजी अष्टेकर, माजी महापौर

शैक्षणिक वर्षाला विलंब झाला आहे त्यामुळे 30 टक्‍के अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र यामधुन कोणता अभ्यासक्रम वगळण्यात आला आहे. याची निश्‍चीत माहिती नसुन नाही अभ्यासक्रमात कपात करण्याबाबत अंतीम निर्णय होणे बाकी आहे. 
अण्णाप्पा पॅटी, शिक्षणाधिकारी 
 

संपादन - मतीन शेख

loading image
go to top