दोन आजाराशी झुंज देत चढली 'ती' लग्नाच्या बोहल्यावर

लग्नाच्या बोहल्यावर एचआयव्ही ‘पॉझिटिव्ह’
दोन आजाराशी झुंज देत चढली 'ती' लग्नाच्या बोहल्यावर
Updated on: 

बेळगाव : बालवयात अनाथपण वाट्याला आले. एचआयव्ही-एड्समुळे आई-वडिलांचे निधन झाले. त्यामध्ये एचआयव्ही आणि क्षयरोगाची बाधा चिमुरडीला झालेली. अंधरुणाला खिळलेल्या चिमुरडीला घरच्यांच्या आधाराची नितांत गरज होती. पण तीला आधार मिळाला माही. त्यामुळे कणबर्गीमध्ये एका संस्थेत आधार घेतला. १८ व्या वर्षापर्यंत तेथे राहिली. त्यानंतर महांतेशनगर आश्रय फौंऊंडेशनमध्ये आश्रय घेतला. संस्थेच्या सहकाऱ्यांने चामराजनगरमधील एचआयव्ही बाधित तरुणाशी विवाह जुळला. लग्नाच्या बोहल्यावर मंगळवारी एचआयव्ही ‘पॉझिटिव्ह’ चढत नव्या जीवनाची सुरवात केली.

एचआयव्हीबाधित गीता (नाव बदलेले आहे) मुळची सौदत्तीची. तिचे आई व वडिल एचआयव्ही बाधीत. त्यांच्यापासून तिलाही त्याचा संसर्ग झालेला. या आजारामुळे तिच्या आई वडिलांचे निधन झाले. यामुळे एचआयव्ही-एड्सशी झुंज देत असताना तिला क्षयरोग झाल्याचे निदान झाले. एका वेळी दोन गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या बालिकेला घरच्यांची साथ हवी होती.

धीर मिळायला हवा होता. पण, तिला नाकारले. त्यामुळे कणबर्गीतील एचआयव्ही-एड्सबाधितांच्या आरोग्य व शैक्षणिक प्रगतीसाठी काम करणाऱ्या संस्थेत आधार घेतला. त्या संस्थेत राहून १८ व्या वर्षापर्यंत १२ वीपर्यंत (कला) शिक्षण घेतले. पण, नियमाप्रमाणे १८ वर्षानंतर तेथून महांतेशनगरमधील आश्रय फौंडेशनमध्ये आश्रय घेतला. तेथे नर्सिंग होम, संगणकासह कौशल्य विकास आधारीत शिक्षण घेतले आणि स्वतःच्या पायावर उभी राहिली. पण, अलिकडे तिला चामराजनगरच्या एचआयव्ही बाधित तरुणाकडून (राजेश नाव बजलेले आहे) विवाहाचा प्रस्ताव आला. बीएड शिक्षण, स्वतःचा व्यवसाय आणि शेती असलेल्या तरुणाच्या कुटुंबातील सर्व जण सरकारी नोकरीमध्ये आहे.

दोन आजाराशी झुंज देत चढली 'ती' लग्नाच्या बोहल्यावर
कोल्हापूर : जिल्हाधिकारी आणि भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी

कुटुंबातर्फे गीताला मागणी घातली. त्याला होकार मिळाल्यानंतर बेळगाव कणबर्गीतील देवस्थानात विवाह पार पडला. विवाहाच्या पूर्वसंध्येला मेहंदीसह हळदीचा कार्यक्रम झाला. हूम्यॅनिटी फाऊंडेशनचे मिली यांनी हा कार्यक्रम आयोजिला होता.यावेळी आश्रय फाऊंडेशन, देणगीदार, सल्लागार समिती, संचालक मंडळ, युवा प्रतिनिधी, हूम्यॅनिटी फाऊंडेशन, पोलिस, कुटुंबातील सदस्य आदींनी नवदाम्पत्यांना भावी जीवनासाठी लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. कोविडचे नियम पाळत विवाह सोहळा संपन्न झाला.

‘‘आमच्या संस्थेतील एचआयव्हीबाधित तरुणीशी विवाह करण्यासाठी चामराजनगरमधील एचआयव्ही तरुणाकडून प्रस्ताव आला होता. त्यावर विस्तृत चर्चा करण्यात आल्यानंतर बेळगावात विवाह पार पडला.’’

नागरत्ना,आश्रय फाऊंडेशन, व्यवस्थापकीय संचालक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Drought, Six Talukas, District Bank Resolution
32-year-old Vikas Chougale drowned in Kasari River
Pune MLC Election, Graduate Teacher Seats,
Maharashtra sugar season
Marathi News Esakal
www.esakal.com