

शंभर कोटींच्या रस्त्यांची कामे सदोषच
दोषींवर कारवाई करा ः ‘बी वॉर्ड अन्याय निवारण’ची मागणी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २१ : सध्या शहरात शंभर कोटींच्या निधीतून होत असलेली रस्त्यांची कामे खराब व सदोष आहेत. तसेच घाईगडबडीत पूर्ण केलेल्या रस्त्यांच्या कामांची चौकशी होऊन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी बी वार्ड अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष किसन कल्याणकर यांनी आज पत्रकाद्वारे केली.
पत्रकात म्हंटले आहे की, शहरातील ज्या रस्स्त्यांची कामे झाली आहेत. ती अतिशय सदोष आणि नियोजनशून्य आहेत. पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहण्याऐवजी थेट घरात घुसण्याची शक्यता आहे. भविष्यातील गोष्टींचा विचार न करता ही कामे घार्ड गडबडीने केली आहेत. त्यामुळे नवे रस्ते करण्यापूर्वीचे रस्तेच बरे होते, असे म्हणण्याची वेळ आली आहे. रस्त्यांच्या कामाचे टेंडर्स दिल्यापासून ही प्रक्रियाच सदोष असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे संबंधितांवर जबाबदारी निश्चित करुन त्यांची सर्वंकष चौकशी करावी. १६ रस्त्यांचा निधी मिळाल्याने हे सर्व रस्ते एकाचवेळी करावेत. विशिष्ट रस्त्यांचाच आग्रह धरणे चुकीचे असून संपूर्ण शहरातील सर्वच रस्स्त्यांच कामे झाली पाहिजेत, अशी भूमिका समितीची आहे. विकासकामासाठी प्रभाग व रस्तेनिहाय भेदभाव करणे अयोग्य आहे. इतरही रस्त्यांची कामे महत्वाची आणि अत्यावश्यक आहेत. त्यामुळे सर्वच १६ रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्णपणे नियोजनबद्ध आणि निर्दोष पद्धतीने झाली पाहिजेत, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे करण्यात येत आहे. तसेच याबाबतचे पत्र मुख्यमंत्र्यांसह संबंधित विभागाच्या मंत्र्यांना पाठवण्यात येणार आहे.
पत्रकावर कार्याध्यक्ष नितीन शेळके, उपाध्यक्ष डॉ. गुरुदत्त म्हाडगुत, पद्माकर कापसे, जयकुमार शिंदे, लक्ष्मण मोहिते, अनिल कोळेकर, मुसा शेख, सुनील हंकारे आदींच्या सह्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.