Hunger Strike : कबनूरमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषणास प्रारंभ
कबनूर : ‘मराठा समाजाला आरक्षण देणे ही काळाची गरज आहे’, असे प्रतिपादन दे.भ.रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पी.एम.पाटील यांनी केले. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे- पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी कबनूर सकल मराठा समाजाच्यावतीने साखळी उपोषण प्रारंभप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मराठा समाज अध्यक्ष प्रा.रवींद्र पाटील यांनी स्वागत केले.
साखळी उपोषणातील उपोषणकर्ते सुरज इंगवले, महेश शिऊडकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य राजाराम झपाटे, मिलिंद कोले, अजितमामा जाधव, दत्तात्रय पाटील, सुनील इंगवले, अनिल साळुंखे, प्रमोद पाटील, बबन केटकाळे, प्रा.अशोक कांबळे, दत्तात्रय शिंदे, उत्तम जाधव, चंद्रकांत आडेकर, प्रा.शरद कांबळे, प्रा.आप्पासाहेब वाघमारे, मुस्लिम ब्रिगेड जिल्हाध्यक्ष बाणदार आदींनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान, दत्तनगरमधील सकल मराठा समाजाच्यावतीने गावातून फेरी काढून साखळी उपोषणास पाठिंबा देण्यात आला. यावेळी सोनाली आडेकर, राजाराम वाकरेकर,अजित खुडे, जयदीप इंगवले आदी उपस्थित होते.
पेठवडगावमध्ये उद्यापासून साखळी उपोषण
पेठवडगाव : पंचक्रोशीतील सकल मराठा समाजाच्यावतीने जरांगे- पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सोमवार (ता.३०) पासून साखळी उपोषण करण्यात येणार आहे. वडगाव नगरपालिका चौकात होणाऱ्या या साखळी उपोषणाकरिता वडगाव सकल मराठा समाजाच्या वतीने गेल्या दोन दिवसांपासून वडगाव पंचक्रोशीतील सर्व गावांत जनजागृती रॅली सुरू केली आहे. उपोषणात दररोज दोन गावे व वडगाव शहरातील दोन वार्डमधील समाजबांधव सहभागी होणार आहेत.
शिरोळमध्ये उद्यापासून चक्री उपोषण
शिरोळः येथे सकल मराठा समाजच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत जरांगे - पाटील यांच्या मराठा आरक्षण लढ्यास जाहीर पाठिंबा देण्यात आला. तसेच रविवारपासून चक्री उपोषण तसेच आमदार खासदार व मंत्री यांना गाव बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
येथील छत्रपती शिवाजी महाराज तक्तमध्ये बैठक झाली. अध्यक्षस्थानी धनाजी पाटील - नरदेकर होते .
मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत शहरातील तरुण मंडळे, नागरिकांचा सहभाग घेवून चक्री उपोषण सुरूच ठेवण्याबाबत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर अंदोलनाची तीव्रता वाढविण्याकरिता कॅन्डल मार्च, निषेध फेरी काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीस नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, रावसाहेब देसाई , पृथ्वीराज यादव, बंटी देसाई ,धनाजी चुडमुंगे, पंडित काळे, दरगू गावडे,किशोर पाटील ,विराज यादव, बजरंग काळे , शिवाजीराव माने - देशमुख , गजानन संकपाळ यांच्यासह सकल मराठा समाजाचे युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पृथ्वीराजसिंह यादव यांनी आभार मानले.
...
सिद्धनेर्लीत राजकीय कार्यक्रम घेऊ नयेत
सिद्धनेर्लीः मराठा आरक्षण मिळेपर्यंत कोणत्याही पक्षांचे राजकीय कार्यक्रम घेऊ नयेत. तसेच गतहंगामातील उसाला चारशे रुपये मिळणे व चालू हंगामातील ऊसदर जाहीर केल्याशिवाय गावामध्ये कोणीही ऊसतोड घेऊ नये, यासाठीचे निवेदन येथील सकल मराठा समाजाच्यावतीने सरपंच दत्तात्रय पाटील यांना देण्यात आले. यावेळी माजी सरपंच वाय. व्ही. पाटील, नामदेव पाटील, अजित पाटील, शिवाजी मगदूम, आशिष पाटील, कृष्णात मेटील, मनोहर लोहार आदी उपस्थित होते.
रुईः मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून येथील सकल मराठा समाजाने गावात सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना प्रवेश बंदीचा निर्णय घेवून तसे फलक गावाच्या वेशीवर ठिकठिकाणी उभे केले आहेत. हा निर्णय मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी गावात प्रवेश करू नये, बैठका घेवू नयेत. तसेच गावातील कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होवू नये, अशा आशयाचे फलक लावून आंदोलनाची तीव्रता वाढविली आहे.
चंदगड ः सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाकडे लक्ष वेधण्यासाठी शहरातून कॅंडल मार्च काढण्यात आला.
चंदगड शहरात कॅंडल मार्च
चंदगड ः चंदगड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने शुक्रवारी रात्री शहरातून कॅंडल मार्च काढण्यात आला. आरक्षणाच्या मुद्यावर समाज आग्रही असून ते मिळेपर्यंत आंदोलनाची धग कायम ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. यापुढील काळात गावागावांतून प्रबोधनपर कार्यक्रम, मोर्चे काढण्याचा निर्णय झाला. चंदगड शहर आणि परिसरातील शेकडो मराठा बांधव कॅंडल मार्चमध्ये सहभागी झाले होते.
श्री देव रवळनाथ मंदिराच्या आवारातून मोर्चाला सुरवात झाली. हातात मेणबत्या घेऊन एकेक कार्यकर्ता सहभागी होऊ लागला. मंदिरापासून मुख्य बाजारपेठेतून फेरी काढण्यात आली. ‘कोण म्हणतंय देत नाय, घेतल्याशिवाय रहात नाय’ अशा घोषणा देण्यात आल्या. संभाजी चौकात फेरीची सांगता करण्यात आली. मार्चमध्ये बळीराजा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नितीन पाटील, तालुकाध्यक्ष सुरेश सातवणेकर, राजाराम सुकये, महादेव वांद्रे, सुधाकर गावडे, विक्रम मुतकेकर, अभिजित गुरबे, नितीन गायचारे, मधुकर देसाई, सुरेश बागीलगेकर यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले.
म्हाकवे: येथील ग्रामपंचायतीच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत लोकप्रतिनिधींना गावात प्रवेशबंदी घालण्याचा ठराव करण्यात आला आहे. कागल तालुक्यात हळदवडेनंतर म्हाकवे गावानेही पाठिंबा दिला असून या लढ्याला तालुक्यातून बळ मिळत आहे. प्रास्ताविक प्रदीप पाटील यांनी केले. पंढरीनाथ पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रघुनाथ पाटील, सुनील देवडकर, निवास पाटील, दशरथ कुंभार, अनिल चौगुले, तुकाराम गुरव, सिकंदर मुल्ला, उमेश चौगुले आदी उपस्थित होते.
कोवाड परिसरातील गावांत साखळी उपोषण
कोवाड ः मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा निर्धार करत कोवाड परिसरातील १५ गावांतून सकल मराठा समाज बांधवानी साखळी उपोषणाला सुरवात केली. मनोज जरांगे- पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविणारे व नेत्यांना गावबंदीचे फलक लावून गावागावांतून आंदोलनाची मशाल पेटविली आहे.
दरम्यान, शुक्रवारपासून कोवाड येथे पांडूरंग जाधव, कल्लापाण्णा भोगण यांनी साखळी उपोषणाची सुरवात केली आहे. किणी, गौळवाडी, नागरदळे, होसूर, तेऊरवाडी, कुदनूर, कालकुंद्री, कागणी येथील मराठा समाज बांधव आंदोलनात सहभागी झाले आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गावागावांतून बैठका होत आहेत. केशरी टोप्या परिधान केलेले मराठा तरुण घोषणाबाजी देत आंदोलनस्थळी जाऊन पाठींबा देत आहेत. मलतावडी येथे माय्यापा पाटील, बाळू सुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली साखळी उपोषण सुरु आहे. उपोषणत उपसरपंच जयवंत पाटील, दयानंद लांडे, राजेंद्र पाटील, मायाप्पा लांडे, बाळाजी पाटील, राणबा पाटील, दयानंद पाटील, रणजित जट्टेवाडकर, शंकर सुंडकर,नामदेव पाटील यांनी सहभाग घेतला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.