
कोल्हापूरातील रेल्वे सुरळीतपणे सुरु व्हावी यासाठी मी वारंवार अधिकाऱ्यांना सूचना करीत असतो. रेल्वेचे उदाहरण इतक्यासाठीच देत आहे की सध्या कोल्हापूर जिल्ह्यात समझोता एक्स्प्रेसची चर्चा आहे.
राजकीय अपघात टाळण्यासाठी मी 'सिग्नल'च्या भूमिकेत - प्रा. संजय मंडलिक
गडहिंग्लज - कोल्हापूरातील (Kolhapur) रेल्वे (Railway) सुरळीतपणे सुरु व्हावी यासाठी मी वारंवार अधिकाऱ्यांना (Officer) सूचना करीत असतो. रेल्वेचे उदाहरण इतक्यासाठीच देत आहे की सध्या कोल्हापूर जिल्ह्यात समझोता एक्स्प्रेसची चर्चा आहे. या एक्स्प्रेसचा कोठे अपघात होऊ नये म्हणून मी सिग्नल दाखविण्याचे काम करीत आहे, असे प्रतिपादन खासदार प्रा. संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी केले.
ऐनापूर (ता. गडहिंग्लज) येथे विविध संस्थांतर्फे सुवर्णमहोत्सवी वैवाहिक दाम्पत्यांचा सत्कार कार्यक्रम झाला. याप्रसंगी प्रा. मंडलिक बोलत होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जयवंतराव शिंप्पी, वीरशैव बँकेचे संचालक सूर्यकांत पाटील- बुद्धीहाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. रेखा कुराडे अध्यक्षस्थानी होत्या. ईश्वरलिंग मंदिराच्या प्रांगणात हा कार्यक्रम झाला.
हेही वाचा: रशिया-युक्रेन युद्धामुळे स्टील दर तेजीत
श्री. घाटगे म्हणाले, 'कागल मतदारसंघात हा विभाग येतो. खासदार संजय मंडलिक आपल्या खासदार फंडातून अनेक गावामध्ये विकासकामासाठी निधी देत आहेत. मी 2024 नंतर नक्की निधी देईन. माझ्याकडून कसा निधी घ्यायचा हे तुम्हीच ठरवा.'' प्रदेश काँग्रेसचे माजी सरचिटणीस अॅड. सुरेश कुराडे म्हणाले,""कागल मतदारसंघातील दोन नेते एकाच व्यासपीठावर आले आहेत. समजणाऱ्यांसाठी हा इशारा पुरेसा आहे.''
प्रा. गीता देसाई यांनी स्वागत केले. माजी सरपंच सूर्याजी मोहिते यांनी प्रास्ताविक केले. विवाहाला 50 वर्षे पूर्ण झालेल्या गावातील 38 दाम्पत्यांचा सत्कार झाला. लक्ष्मीबाई जाधव यांचा शंभरावा वाढदिवस साजरा करण्यात आला. ग्रामपंचायतीला आयएसओ मानांकन मिळाल्याबद्दल पदाधिकारी व ग्रामसेवकांचा सत्कार झाला. जे. बी. बारदेस्कर, नरेंद्र भद्रापूर, श्रीरंग चौगुले, सोमगोंडा आरबोळे, हणमंत देसाई, जयवंत होडगे, दयानंद पोवार, किरण कुराडे, विश्वजित पोवार आदी उपस्थित होते. प्रा. श्रद्धा पाटील व जनार्दन पालकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रभारी सरपंच ईश्वर देसाई यांनी आभार मानले.
...हे तर आपले कर्तव्य
प्रा. संजय मंडलिक म्हणाले, 'सुसंस्कृत जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. आपण थोरामोठ्यांच्या, आई-वडीलांच्या संस्कारातून आयुष्यात उभारी घेत असतो. आई-वडीलांचा सांभाळ करणे व महिलांचा आदर करणे हे तर आपले कर्तव्यच आहे.'
Web Title: I Am In The Role Of Signal To Prevent Political Accident Sanjay Mandlik
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..