
इचलकरंजी : तब्बल सोळा वर्षानंतर नियुक्ती; अनुकंपा तत्वाखाली २५ उमेदवारांना दिलासा
इचलकरंजी : जिल्ह्यातील विविध पालिकांमध्ये अनुकंपा तत्वावरील २५ उमेदवारांची नियुक्ती करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिले आहेत. तब्बल १६ वर्षापासून हे उमेदवार नियुक्तीच्या प्रतिक्षेत होते. यामध्ये इचलकरंजीतील पाच उमेदवारांचा समावेश आहे. इचलकरंजी व जयसिंगपूर पालिकेकडे प्रत्येकी पाच उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वाधिक १६ उमेदवारांची लिपिक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. दिवगंत अधिकारी अथवा कर्मचा-यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावरती भरीत केली जाते. पण जिल्ह्यातील पालिकांमधील अनुकंपा भरतीची प्रक्रिया गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबीत होती.
त्यामुळे संबंधित उमेदवार हवालदिल झाले होते. खासदार धैर्यशील माने यांनी याबाबतचा विशेष पाठपुरावा केला. तर पालिका कर्मचा-यांचे नेते रवी रजपूते यांनीही प्रयत्न सुरु ठेवले होते. त्याला आता यश आले आहे. पहिल्या टप्प्यात पात्र २५ वारसांना अनुकंपा तत्वाखाली सात दिवसांत नियुक्तीचे आदेश संबंधित पालिकांना जिल्हाधिका-यांनी दिले आहेत. या संदर्भात जिल्ह्यातील पालिकांमधील स्थायी रिक्त पदांची माहिती घेवून अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देण्यासाठी प्रतिक्षा सुची जिल्हा प्रशासनाकडून तयार करण्यात आली होती. शासन निर्णयाप्रमाणे रिक्त पदांच्या २० ट्केक प्रमाणात जेष्ठते नुसार नियुक्ती करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रेखावार यांनी संबंधित पालिकांना दिले आहेत. नियुक्तीची कार्यवाही सात दिवसांत पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
सर्वाधिक प्रत्येकी पाच उमेदवरांची इचलकरंजीसह जयसिंगपूर पालिकेकडे नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वाधिक १६ उमेदवारांची लिपीक पदावर नियुक्ती करण्यात आली असून शिपाई, पंप आॅपरेटर, वाहन चालक, लघुलेखक, व्हाॅलमन आदी पदांचा यामध्ये समावेश आहे. संबंधित उमेदवारांना सर्व शैक्षणिक व तांत्रिक कादपत्रांची तातडीने पूर्तता करावी लागणार आहे.
अनुकंपा नियुक्ती दृष्टीक्षेप
नगरपालिका - संख्या
इचलकरंजी ५
जयसिंगपूर ५
कुरुंदवाड ३
पन्हाळा २
गडहिंग्लज २
मलकापूर २
कागल २
पेठवडगाव २
मुरगूड २
Web Title: Ichalkaranji Appointed After 16 Years 25 Candidates Under Principle Of Compassion Rahul Rekhawar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..