Ichalkaranji Election Result 2026
esakal
इचलकरंजी : इचलकरंजी महापालिका निवडणुकीत (Ichalkaranji Municipal Election) भाजपने ४३ जागांवर विजय मिळवत बहुमताचा आकडा पार केला. या विजयाने महापालिकेतील सत्तेसोबत राज्यस्तरीय राजकारणामधील चर्चांना तोंड फुटले आहे. इचलकरंजी भाजपला मिळालेल्या या यशामागे भाजपचे आमदार राहुल आवाडे आणि माजी आमदार सुरेश हाळवणकर यांची भूमिका निर्णायक होती. त्यामुळे या यशाचा फायदा आवाडे आणि हाळवणकर यांना होणार का? आमदार आवाडे यांना मंत्रिपद आणि हाळवणकर यांची विधान परिषदेत नियुक्ती होणार का?, याबाबत तर्कवितर्क बांधण्यात येत आहेत.