Pankaja Munde
esakal
इचलकरंजी : ‘शहरातील काळ्या ओढ्याला गोरे करायचे असेल तर सर्वप्रथम त्याचे प्रदूषण थांबवणे गरजेचे आहे. यासाठी राज्यशासनाने नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणाची स्थापना केली असून केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर माझी पुढील खेप इचलकरंजीच्या काळ्या ओढ्यासाठीच असेल’, अशी ग्वाही पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी दिली. यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबतही महत्त्वाचं वक्तव्य केलंय.