Prakash Ambedkar
esakal
इचलकरंजी : ‘निवडणुकीत उमेदवारांची पळवापळवी, दमदाटी, दबावतंत्रामुळे महाराष्ट्राचा बिहार होतोय की, काय, अशी चिंता निर्माण झाली आहे. आतापर्यंत जे काही झाले त्याला मतदारच जबाबदार आहेत. त्यामुळे पैसे, दारूच्या आमिषाला बळी न पडता मतदारांनी प्रस्थापितांना हद्दपार करून महापालिका निवडणुकीत नवा पायंडा पाडावा आणि लोकशाही प्रस्थापित करावी’, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केले.