इचलकरंजी : शहापूर येथील एका हायस्कूल परिसरात असलेल्या पान शॉपमध्ये (Paan Shop) बनावट नोटांच्या व्यवहाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पानपट्टी चालकाच्या सतर्कतेमुळे बनावट नोटा वापरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Ichalkaranji Police) प्रमोद पोवार, अवधूत पोवार (दोघे रा. सुतार मळा) या संशयितांना अटक केली असून, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.