शहरभर फिरविल्यानंतर आरोपींना गावभाग परिसरातील शांतीनिकेतन शाळेसमोर आणून त्यांना चौकशीसाठी उभे करण्यात आले. यावेळी पोलिसी खाक्या पाहून या गुन्हेगारांचा माज उतरलाच.
इचलकरंजी : वाढदिवसाच्या नावाखाली रस्त्यावर साऊंड सिस्टीम लावून धिंगाणा घालणाऱ्या आणि शहरात दहशत निर्माण करणाऱ्या जर्मनी गँगसह (Germany Gang) मोकातील गंभीर गुन्हेगारांना पोलिसांनी शहरभर फिरवत चांगलाच दणका दिला. साईनगर आणि जुना सांगली नाका परिसरात वाढदिवस (Birthday) साजरा करत साऊंड सिस्टीमच्या आवाजात धुडगूस घालणाऱ्या सहाजणांना पोलिसांनी (Ichalkaranji Police) ताब्यात घेऊन घटनास्थळी नेले आणि कडक चौकशी केली.