esakal | इचलकरंजीत पोलिसांची जनजागृती रॅली 
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजीत पोलिसांची जनजागृती रॅली 

कोरोनासारख्या अदृश्‍य संसर्गाशी सामना करण्यासाठी आम्ही रस्त्यावर आहोत, तुम्ही घरातच राहून सहकार्य करा... असे फलकाद्वारे भावनिक संदेश देत आज सायंकाळी पोलिसांनी भव्य रॅली काढली. तब्बल दोनशेहून अधिक पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि गृहरक्षक दलाचे जवान व भव्य वाहनांचा ताफा या रॅलीमध्ये सहभागी झाला होता.

इचलकरंजीत पोलिसांची जनजागृती रॅली 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

इचलकरंजी : कोरोनासारख्या अदृश्‍य संसर्गाशी सामना करण्यासाठी आम्ही रस्त्यावर आहोत, तुम्ही घरातच राहून सहकार्य करा... असे फलकाद्वारे भावनिक संदेश देत आज सायंकाळी पोलिसांनी भव्य रॅली काढली. तब्बल दोनशेहून अधिक पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि गृहरक्षक दलाचे जवान व भव्य वाहनांचा ताफा या रॅलीमध्ये सहभागी झाला होता.

नागरिकांनी ठिकठिकाणी टाळ्या वाजवून पोलिसांना यावेळी अभिवादन केले. 
शहरात नागरिकांमध्ये कोरोनाबाबत जागृती व्हावी यासाठी पोलिस प्रशासन आज पुढे आले. पोलिस उपअधिक्षक गणेश बिरादार यांच्या नेतृत्वाखाली वीसहून अधिक पोलिस अधिकारी या रॅलीच्या अग्रभागी होते. त्यानंतर बहुतांश पोलिस आणि गृहरक्षक जवानांनी हातामध्ये नागरिकांना संदेश देणारे फलक घेतले होते. थोरात चौक येथून या रॅलीला सुरवात झाली. शहरातील दाट लोकवस्तीच्या भागातून ही रॅली काढण्यात आली. रॅलीच्या सुरवातीला पालिका आपत्ती निवारण विभागाचे कर्मचारी आधुनिक बुलेट घेऊन पुढे होते. त्यानंतर अधिकारी, कर्मचारी आणि वाहनांचा ताफा होता. 

थोरात चौक, नेहरूनगर झोपडपट्टी, वखारभाग, कॉंग्रेस कमिटी, जनता चौक, धान्य ओळ, दाते मळा, गावभाग अशा दाट लोकवस्तीच्या भागातून ही रॅली नाट्यगृहाजवळ आली आणि त्या ठिकाणी या रॅलीची सांगता झाली. रॅलीच्या मार्गावर नागरिकांनी घराच्या दारात व गॅलरीमध्ये राहून टाळ्या वाजवून या पोलिसांच्या कार्याला सलामी दिली. 

loading image
go to top