एका कॉलवर घरपोहोच दिल्या जात होत्या गर्भपाताच्या गोळ्या; दोन रुग्ण सेविकांकडून विक्री, किटमागे 5 हजारांची कमाई

Abortion Drugs Sale : आरोग्य विभागाला या दोघींकडून गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यांना रंगेहाथ पकडण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांनी एक सापळा रचला होता.
Abortion Drugs Sale
Abortion Drugs Saleesakal
Updated on: 
Summary

गर्भपातासाठी एकूण पाच गोळ्यांचा वापर केला जातो. संबंधित महिलेला एक गोळी खायला दिली जाते. तर दोन-दोन गोळ्या गर्भाशयाच्या मार्गे दिल्यानंतर रक्तस्त्राव होऊन गर्भवात होतो.

-गौरव डोंगरे

कोल्हापूर : दिवसभर घरोघरी फिरून रुग्णसेवा देणाऱ्या महिलांकडून गर्भपाताची औषधे विक्रीचा (Sale of Abortion Drugs) सुरू असणारा काळा बाजार समोर आला असून, एका कॉलवर मागणी करेल त्या ठिकाणी जाऊन गर्भपाताचे किट त्या दोघी पोहोचवत होत्या. पाच हजार रुपयाला किटची विक्री केल्यानंतर त्या दोघी गर्भपाताचा सल्लाही देत होत्या, असा धक्कादायक प्रकार आरोग्य विभागाने (Health Department) केलेल्या कारवाईतून उजेडात आला.

Loading content, please wait...