"हसन मुश्रीफ यांना लांबचा जिल्हा मिळाला आहे. त्यांना जवळचा जिल्हा मिळावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. ते मोठे नेते आहेत. त्यांच्या पक्षातील प्रमुख याची दखल घेऊन लवकरच त्यांना जवळचा जिल्हा देतील."
कोल्हापूर : ‘हद्दवाढीसाठी (Kolhapur Boundary Extension) पालकमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत परवाच सकारात्मक बैठक झाली. हद्दवाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे. लवकरच शहराची हद्दवाढ होईल,’ अशी माहिती खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी दिली. हस्तकला प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.