कोल्हापूर : तिसऱ्या लाटेत रुग्‍णसंख्या दीडपटीने वाढणार

आरोग्य विभागाचा अंदाज; बेड, व्‍हेंटिलेटर सज्‍ज
Corona Patients
Corona PatientsSakal

कोल्‍हापूर : कोरोनाची तिसरी (corona third wave)लाट आली, तर त्याचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाने(health department) कंबर कसली आहे. पहिल्या व दुसऱ्या लाटेचा अभ्यास करून संभाव्य तिसऱ्या लाटेची तयारी करण्यात आली आहे. या लाटेत दुसऱ्या लाटेच्या दीडपट संख्येने लोक बाधित होतील, असा अंदाज आहे. दुसऱ्या लाटेत ३ मे २०२१ मध्ये जास्‍तीत जास्‍त ॲक्टिव्ह रुग्‍णसंख्या १६ हजार २९९ इतकी होती. तिसऱ्या लाटेत ही रुग्‍णसंख्या दीडपटीने वाढून ती जास्‍तीत जास्‍त २४ हजार ४४९ इतकी होईल, असा अंदाज आहे. ही रुग्‍णसंख्या (patient)गृहीत धरून पुढील नियोजन सुरू आहे.

कोरोनाच्या(corona) संभाव्य तिसऱ्या लाटेचे नियोजन करण्यात येत आहे. गुरुवारी ओमिक्रॉनचा पहिला (omicron)रुग्‍ण सापडल्याने निर्बंध अधिकाधिक कडक करण्याचे धोरण जिल्‍हा प्रशासनाने(kolhapur district) घेतले आहे. ओमिक्रॉनमुळे रुग्‍ण दुप्‍पट होण्याचा कालावधी अत्यंत कमी असल्याने, भराभर रुग्‍णवाढीचे संकेत मिळत आहेत. मागील दोन कोरोना लाटांचा अभ्यास करून आरोग्य विभागाने संभाव्य तिसरी लाट कशी असेल, त्यासाठी काय उपाययोजना केल्या जातील, याचा आराखडा तयार केला आहे.दुसऱ्या लाटेत दहा दिवसांतील ॲक्टि‍व्ह रुग्‍णसंख्या ही १६ हजार २९९ इतकी होती. तर तिसऱ्या लाटेत ही रुग्‍णसंख्या २४ हजार ४९९ इतकी होईल, असा अंदाज आहे. या रुग्‍णांपैकी ६५ टक्‍के रुग्‍णांना घरातच विलगीकरणात ठेवले जाणार आहे.

Corona Patients
कोल्हापूरात वर्षभरात झाली ८६९ कोटींची गुंतवणूक

तर ३५ टक्‍के लोकांवर रुग्‍णालयात उपचार केले जाणार आहेत. रुग्‍णालयात दाखल होणाऱ्या रुग्‍णांमधील किती रुग्‍णांना ऑक्सि‍जन बेड, तसेच व्‍हेंटिलेटर लागेल, याचा अंदाजही बांधण्यात आला आहे. आरोग्य विभागाने गृहीत धरलेल्या अंदाजानुसार रुग्‍णसंख्या राहिली, तर आरोग्य विभागाने केलेली तयारी पुरेशी राहणार आहे. कारण बेड, ऑक्सि‍जन बेड, व्‍हेंटिलेटरची संख्या ही अपेक्षित बाधित रुग्‍णांच्या तुलनेत बरीच आहे. मात्र रुग्‍णसंख्या कमी राहणार की जास्‍त, हे पूर्णपणे त्यावेळच्या परिस्‍थितीवरच अवलंबून राहणार आहे. मागील दोन लाटांच्या तुलनेत यावेळी लसीकरण मोठ्या प्रमाणात वाढल्याने काही प्रमाणात या लाटेचा प्रभाव कमी राहील, असा अंदाज आरोग्य विभागाकडून वर्तवण्यात येत आहे.

कोविड रुग्‍णांच्या उपचारासाठी मूलभूत सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्‍ध आहेत. मात्र, ही लाट येऊच नये, यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. मागील दोन लाटांमध्ये दहा दिवसांतील सर्वाधिक बाधित रुग्‍णसंख्या अपेक्षित होती, तेवढी रुग्‍णसंख्या आढळलेली नाही. यावेळीही वेगळे चित्र असणार नाही. मागील दोन लाटांमध्ये जिल्‍ह्यात बाहेरून येणाऱ्या रुग्‍णांची संख्या वाढल्याने व्‍हेंटिलेटर उपलब्‍ध झाले नाहीत. मात्र, ऑक्सि‍जनसह इतर बेड अपेक्षेपेक्षा जास्‍त उपलब्‍ध आहेत.

- डॉ. योगेश साळे,

जिल्‍हा आरोग्य अधिकारी

Corona Patients
मोदींच्या संपत्तीत वर्षभरात २२ लाखांची वाढ; कुठे करतात गुंतवणूक?

दृष्टिक्षेपात

  1. तिसऱ्या लाटेची अशी असेल तयारी...

  2. दहा दिवसांत जास्‍तीत जास्‍त ॲक्टिव्‍ह रुग्‍ण २४४४९

  3. यातील गृह अलगीकरण (६५ टक्‍के) १५८९२

  4. रुग्‍णालयात उपचार (३५ टक्‍के) ८५५७

  5. ऑक्सि‍जन नसलेल्या बेडची गरज ५१४४

  6. उपलब्‍ध बेड ११७१८

  7. ऑक्सि‍जन बेडची गरज २७४४

  8. उपलब्‍ध ऑक्सि‍जन बेड ४०२७

  9. व्‍हेंटिलेटरची गरज असणारे रुग्‍ण ३४४

  10. उपलब्‍ध व्‍हेंटिलेटर ४०४

  11. व्‍हेंटिलेटर नसलेले आयसीयू बेड गरज ३४४

  12. उपलब्‍ध बेडची संख्या ५३१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com