जिद्दीला सलाम: कोल्हापूरच्या रणरागिणीची लेफ्टनंट कर्नलपदी झेप

कमांडींग ऑफिसर कर्नल चेतन मोसन यांच्या हस्ते या पदाची सुत्रे देण्यात आली.
minal shinde
minal shindeesakal

कोल्हापूर: सीमेवर रात्रदिवस डोळ्यात तेल घालून कर्तव्य बजावणाऱ्या डेप्युटी कमांडर मीनल शिंदे-चव्हाण यांनी कोल्हापूरच्या (Kolhapur) शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला. त्यांना आज लेफ्टनंट कर्नलपदी पद्दोन्नती मिळाली. कमांडींग ऑफिसर कर्नल चेतन मोसन यांच्या हस्ते या पदाची सुत्रे देण्यात आली.

उंब्रज (Umbraj) तालुक्यातील हनुमानवाडी हे मीनल शिंदे-चव्हाण यांचे मूळचे गाव. घरची परिस्थिती बिकट असतानाही त्यांच्या आई-वडीलांनी त्यांना उच्च शिक्षण देण्याचा निर्धार केला. त्यांच्या इच्छेनुसार शिंदे-चव्हाण यांनी अनेक अडचणीवर मात करून शालेय शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत पूर्ण केले. शिष्यवृत्तीमुळे त्यांची सातार (Satara) येथील गुरूकुलमध्ये निवड झाली. त्यांनी कला शाखेची पदवी पूर्ण केली.

minal shinde
राजेश क्षीरसागरांचे भाजपावर टीकास्त्र; म्हणाले,आमची मर्दाची पध्दत....

प्रशासकीय अधिकारी पेक्षा त्यांनी सैन्यदलात (Regiment)जावून देशसेवा करण्याचा निर्धात केला. त्यासाठी त्या कोल्हापुरात स्थायिक झाल्या. त्यांनी स्पर्धा परीक्षेची (युपीएससी)ची तयारी सुरू केली. त्यांनी केलेल्या कष्टाचे चीज झाले. त्यांना २००८ मध्ये पहिल्याच प्रयत्नात यश आले. देशातील प्रथम पाच क्रमांकामध्ये स्थान पटकावले. त्यांची भारतीय सैन्य दलात निवड झाली.

minal shinde
'उमेदवार पाडण्यासाठी चंद्रकांतदादांनी शिवसेनेच्या पाठीत खंजिर खुपसला'

चैन्नई येथील खडतर प्रशिक्षण पूर्ण करून त्यांनी सेवेची सुरवात जम्मू-कश्मीर (Jammu-Kashmir) येथील राजोरी, पुंछ, नारिया अशा संवेदनशील ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केले. कॅप्टनपदी पद्दोन्नतीवर झालेल्या बदली पदावर त्यांनी लेह-लडाक येथे दोन वर्षे नैसर्गिक उणे २५ डिग्री सेलसियस् अशा थंडीत उल्लेखनीय सेवा बजावली. त्यांचा विवाह उप-अधीक्षक सुशांत चव्हाण यांच्याशी झाला. त्यानंतर त्यांनी रांची, गुहाटी, आसाम येथे कर्तव्य बजावले. सध्या त्यांच्याकडे एएससी बटालून देहराधून येथे डेप्युटी कमांडरचा पद्भार होता. त्यांना आता लेफ्टनंट कर्नलपदी पद्दोन्नती मिळाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com