जनतेचे माझ्यावर अनंत उपकार ; ग्रामविकास मंत्री मुश्रीफ   | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Infinite gratitude of the people to me Rural Development Minister Mushrif

गेली 40 वर्ष सामाजिक जीवनात आहे. सहा वेळा विधानसभा निवडणूक लढविली. त्यापैकी सलग पाचवेळा जनतेने निवडून दिले

जनतेचे माझ्यावर अनंत उपकार ; ग्रामविकास मंत्री मुश्रीफ  

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सिद्धनेर्ली - कागल, गडहिंग्लज व उत्तर विधानसभा मतदारसंघातील जनतेने भरभरून प्रेम देऊन माझ्यावर अनंत उपकार केले आहेत. आजवरचे आयुष्य जनतेची इमाने-इतबारे सेवा करण्यातच खर्ची घातले. उर्वरित आयुष्यातही जनतेचे हे पांग फेडण्याची शक्ती गोमातेने द्यावी, अशी प्रार्थना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. करनूर (ता. कागल) येथील शिंदे मळ्यामध्ये वसुबारसच्या निमित्ताने गोमातेची पूजा मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते झाली. 

ते म्हणाले, ""गेली 40 वर्ष सामाजिक जीवनात आहे. सहा वेळा विधानसभा निवडणूक लढविली. त्यापैकी सलग पाचवेळा जनतेने निवडून दिले. त्यामुळेच मला पंचवीस वर्षे आमदार व 16 वर्ष मंत्रिपदाचा बहुमान मिळाला. जनतेचे हे ऋण या जन्मीच काय,तर सात जन्मातही फेडू शकत नाही. जनतेचा हा पांग फेडण्याच्या कृतज्ञतेच्या भावनेतूनच निराधारांची सेवा, विकासकामे, बांधकाम कामगारांचे शहर राज्यातील कामगारांचे कल्याण, आरोग्यसेवेच्या माध्यमातून आयुष्य खर्ची घातले आहे. उर्वरित आयुष्यही त्याच कृतज्ञतेच्या भावनेने कार्यरत राहू.'' 

कार्यक्रमास महम्मद शेख, रावसाहेब चौगुले, इम्रान नायकवडी, वजिर नायकवडी, समीर शेख, सदाशिव पाटील, रंगराव पाटील, अण्णासो पाटील, अशोक कांबळे, तानाजी शिंदे, कृष्णात चव्हाण, धनाजी शिंदे, दयानंद शिंदे, मयूर शिंदे, महादेव शिंदे, विष्णू शिंदे, कुमार पाटील, अरुण जाधव उपस्थित होते. स्वागत प्रवीण कांबळे यांनी केले. तातोबा चव्हाण यांनी आभार मानले. 

हे पण वाचाफ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारताना राहा दक्ष ; विवस्त्र फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

विकास पर्व आणणार 
श्री. मुश्रीफ म्हणाले, ""आजपर्यंतच्या वाटचालीत विकासकामांसह निराधारांची सेवा, रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून केलेली आरोग्यसेवा, बांधकाम कामगारांसह कामगारांचे कल्याण, जनतेच्या समस्यांचा निपटारा तळमळीने केला. मंत्रिपदाच्या माध्यमातून मतदारसंघात नवे विकासपर्व आणणार.'' 

संपादन - धनाजी सुर्वे 

loading image
go to top