Kolhapur Bandh: कोल्हापुरातील इंटरनेट कधीपर्यंत बंद राहणार? गृह विभागाच्या सचिवांनी सांगितली तारीख आणि वेळ

आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्यावरुन कोल्हापुरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
Kolhapur Bandh
Kolhapur Bandh

कोल्हापूर : आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्यावरुन कोल्हापुरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यासाठी आज (बुधवार) कोल्हापूर बंदचं आवाहन केलं होतं. पण त्याला काहीसं हिंसक वळण मिळालं काही भागात तोडफोडीच्या घटना घडल्या. हिंदू संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानं मोठ्या प्रमाणावर तरुण रस्त्यावर उतरले होते. (internet will be shut down in Kolhapur Date and time specified by the Secretary Home Department)

पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. त्यानंतर सकाळी इंटरनेट सेवाही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण ही सेवा कधी पर्यंत बंद राहिल याचं स्पष्टीकरण देण्यात आलं नव्हतं. पण आता याबाबत अधिकृत निवेदन काढण्यात आलं आहे.

निवेदनानुसार, कोल्हापुरातील तणावाची परिस्थिती लक्षात घेता पुढचे 31 तास इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गृह विभागाच्या सचिवांनी इंटरनेट बंद करायला परवानगी दिली आहे, यामुळे 8 जूनच्या मध्यरात्रीपर्यंत इंटरनेट सेवा बंद राहणार आहे.

कुठल्याही अफवा, चुकीच्या गोष्टी आणि तत्सम बातम्या व्हॉटस्अपवरुन किंवा सोशल मीडियावरुन व्हायरल होऊ नयेत यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचं यामध्ये सांगण्यात आलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com