'आयपीओ' मध्ये गुंतवणूक ठरतेय आनंदाची पर्वणी

जिल्ह्यातून वाढता प्रतिसाद ; ग्रामीण भागातून अनेकांचा ओढा
share market
share marketsakal media

कोल्हापूर : शेअर बाजारात गुंतवणूक(share market investment) हा शब्द कोल्हापूरमध्ये पर्वणीच ठरत आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातूनही यात रस घेतला जात असल्याची समाधानाची बाब बाजारपेठेत आहे. अधिकतर नामांकित कंपनीचे समभाग (shares ) घेणे आणि विकणे हे होत असले तरीही ‘आयपीओ‘मध्ये (intial public offering) गुंतवणूक वाढल्याचे चित्र आहे. असे येथील ब्रोकरेज सेवा देणारे सांगतात. जिल्ह्यातील अनेक लोक सध्या विविध‘आयपीओ‘कडे आकर्षित होत आहेत. कोल्हापूर येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात सर्वाधिक ब्रोकरेज कंपनी असल्या तरीही, शाहूपुरी, राजारामपुरी, नागाळा पार्क या परिसरासह रंकाळा परिसरात शेअर मार्केटमधील गुंतवणुकीबद्दल मार्गदर्शन केले जाते.

share market
वीज वापराच्या नावाखाली 12 हजार कोटींचा भ्रष्टाचार : प्रताप होगाडे

शेअर मार्केटच्या लिस्टेड कंपनीत व्यवहार करणाऱ्यामध्ये जिल्ह्यातील संख्या अधिक आहे. त्यात ग्रामीण भागातून अनेकांचा ओढा आहे. असे असले तरीही ‘आयपीओ‘मधील गुंतवणुकीबाबत हात आखडता घेत गुंतवणूक पुन्हा सेफ ठेवण्याचा अधिक प्रयत्न केला जातो. काही मोठे गुंतवणूकदार ‘आयपीओ‘चे काही शेअरआवर्जून घेतात. कोणताही ‘आयपीओ‘ खुला झाल्यानंतर त्याच्यासाठी लावल्या जाणाऱ्या बोलीनुसार शेअर्स मिळतील की नाही हे ठरते. प्रत्येक वेळेला ‘आयपीओ‘चे समभाग मिळवणे हे शक्य होईलच असे नाही. या कारणामुळे जिल्ह्यात या पर्यायाकडे गुंतवणूक आणि परताव्याचा पर्याय म्हणून बघण्याचा दृष्टिकोन दुय्यम आहे.

share market
व्यापारी निलेश पटेल याच्यावर गुन्हा दाखल करावा; शिवसेनेतर्फे मागणी

‘आयपीओ‘ म्हणजे

गुंतवणुकीच्या पर्यायांपैकी असणारा एक पर्याय म्हणजे ‘आयपीओ‘, दोन प्रकारात चालणार हा शेअरबाजार प्रामुख्याने प्रायमरी मार्केट जसे, की आयपीओ, तर सेकंडरी मार्केट म्हणजेच मार्केटमध्ये असणारे लिस्टेड शेअरमध्ये व्यवहार या दोन प्रकारावर चालते. ‘आयपीओ‘मध्ये एखादी कंपनी काही शेअर्स व्यवहारासाठी खुले करते. या शेअरच्या सामान्यांच्या गुंतवणुकीतून उपलब्ध होणारा निधी हा त्या कंपनीच्या विविध कामासाठी वापरला जातो. नव्याने शेअर मार्केट मध्ये येऊन सर्वांसाठी आपले शेअर व्यवहारासाठी खुले करणे म्हणजे आयपीओ होय.

आयपीओ बाबत

सेबी (SEBI) ‘आयपीओ‘ आणणाऱ्या कंपन्यांसाठी सरकारी नियामक आहे. हे ‘आयपीओ‘ आणणाऱ्या कंपन्यांना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास भाग पाडते. सेबीला सर्व प्रकारची माहिती देणे अनिवार्य अट आहे. ‘आयपीओ'' आणल्यानंतर सेबी कंपनीची माहिती योग्य आहे, की नाही याबद्दल चौकशी करते. जेव्हा बाजारात अनेक ‘आयपीओ‘ येत असतात, तेव्हा याचा अर्थ शेअर बाजाराची किंवा अर्थव्यवस्थेची स्थिती ठीक असल्याचे दिसते. जेव्हाही कोणत्याही प्रकारचे आर्थिक संकट येते, त्या वेळी आयपीओची लिस्टिंग कमी होते.

जिल्ह्यात शेअर मार्केटमधील गुंतवणुकीचा टक्का वाढत असला तरीही ‘आयपीओ‘मधील गुंतवणूक मोजकीच आहे. या गुंतवणूक पर्यायाबद्दल सध्या जागृती होत असल्याने येणाऱ्या कालावधीत यातील गुंतवणूक वाढेल अशी आशा आहे.

-अमित पाटणेकर, गुंतवणूक सल्लागार.

share market
मुख्यमंत्री, शरद पवारांसह अनेकांनी सिंधूताईंना वाहिली श्रद्धांजली

अनेक वर्षांपासून शेअर मार्केटसह कमोडिटी मार्केटसारख्या गुंतवणूक पर्यायात व्यवहार केले आहेत. ‘आयपीओ‘मधील गुंतवणुक ही कंपनीच्या प्रोफाइलनुसार करावी लागते. हे समजून घेतल्यास ही गुंतवणूक अधिक फायद्याची ठरू शकते.

-युवराज पाटील, गुंतवणूकदार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com