Jalna Maratha Andolan : 'मराठा समाजाला डिवचाल तर हिशेब चुकता करू'; पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचे कोल्हापुरात पडसाद

मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचे पडसाद कोल्हापुरात उमटले.
Kolhapur Maratha Community
Kolhapur Maratha Communityesakal
Summary

‘मराठा कार्यकर्त्यांवर लाठीमाराचा आदेश देणाऱ्या गृहमंत्र्यांचा धिक्कार असो’, ‘या सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय’, अशा घोषणा दिल्या.

Kolhapur News : मराठ्यांवर लाठीमार करणाऱ्या पोलिसांचा धिक्कार असो, महिलांवर लाठीमार करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, मराठा समाजावर (Maratha Community) भ्याड हल्ला करणाऱ्या जालनाच्या पोलिस अधीक्षकांचा धिक्कार असो, अशा घोषणा देत सकल मराठा समाजाने कोल्हापुरात संताप व्यक्त केला.

Kolhapur Maratha Community
पोलिसांनी मराठा आंदोलकांवर का केला लाठीचार्ज?, जालन्यात नेमकं काय घडलं?; संपूर्ण घटनाक्रम वाचा...

जालनाच्या पोलिस अधीक्षकांना निलंबित करा, अशी मागणी करत मराठा समाजाला पुन्हा डिवचाल तर याद राखा व याचा हिशेब चुकता करू, असा इशाराही दिला. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (Jalna Maratha Reservation) येथे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचे पडसाद कोल्हापुरात (Kolhapur Maratha Community) उमटले.

सकल मराठा समाजाचे समन्वयक रात्री आठच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमले. त्यांनी ‘हा आवाज कुणाचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठ्यांचा’, ‘मराठा कार्यकर्त्यांवर लाठीमाराचा आदेश देणाऱ्या गृहमंत्र्यांचा धिक्कार असो’, ‘या सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय’, अशा घोषणा दिल्या.

Kolhapur Maratha Community
Kolhapur : ओबीसी कोट्यातूनच आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, अन्यथा उग्र आंदोलन छेडणार; मराठा समाजाचा थेट इशारा

या वेळी वसंतराव मुळीक म्हणाले, ‘मराठा आरक्षणासाठी लोकशाही पद्धतीने आंदोलन सुरू आहे. जालना येथे हजारो आंदोलक आरक्षणाच्या मागणीसाठी एकत्र आले होते. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या मागण्या न्याय असल्याचे सांगितले होते. या परिस्थितीत लगेच मराठा कार्यकर्त्यांवर लाठीमार करण्यात आला.

शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात असे घडत असेल तर मराठा समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. लाठीमाराचा आदेश देणाऱ्या पोलिस अधीक्षकांना निलंबित करावे. तसेच गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा.’ बाबा इंदुलकर म्हणाले, ‘अंतराली सराटी येथे आरक्षणासाठी उपोषणास बसलेले कार्यकर्ते लढवय्ये आहेत. त्यांच्यावर लाठीमार करणे, हे दुर्दैवी आहे. मराठ्यांनी ५८ मोर्चे शांततेत काढले असून, आरक्षणासाठी शांततेने आंदोलन केले जात आहे.

Kolhapur Maratha Community
Loksabha Election : लोकसभा निवडणुकीपूर्वीच मोठ्या हालचाली; काँग्रेस-भाजपात गेलेले 'हे' बडे नेते पुन्हा पक्षात परतणार?

मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालेच पाहिजे. मराठ्यांवर लाठी हल्ला करण्याचा हा पहिला प्रयोग असून, त्याचा हिशेब जरूर चुकता करू.’ दिलीप देसाई म्हणाले, ‘मराठा कार्यकर्त्यांचा उपोषणाचा पाचवा दिवस असताना निर्दयी सरकारने लाजीरवाणे कृत्य केले आहे. मराठाद्वेषी पोलिस अधीक्षकांची तत्काळ बदली करावी.’

यावेळी विजय देवणे, रविकिरण इंगवले, दिलीप पाटील, शंकरराव शेळके, प्रकाश पाटील, चंद्रकांत चव्हाण, सरदार पाटील, प्रताप नाईक, विजय पाटील, दीपक मुळीक, प्रतीक साळुंखे, प्रणव डाफळे, विराज पाटील, नील मुळीक, प्रसाद पाटील, मंजित माने, महादेव जाधव, शाहीर दिलीप सावंत, उदय लाड, सचिन जगदाळे, किशोर डवंग, अवधूत पाटील आदी उपस्थित होते.

जालना येथे मराठा कार्यकर्त्यांवर झालेल्या हल्ल्याचा मी निषेध करतो. प्रश्‍न अनेक भिजत पडल्याने आंदोलकांच्या भावना तीव्र होणे, साहजिक आहे. अशावेळी प्रश्‍न कौशल्याने न हाताळता चळवळ मोडून काढण्याची भूमिका सरकारची असेल, तर भविष्यात जशास तसे उत्तर मिळेल. चळवळ दडपून संपत नाही. तर सामोपचाराने चर्चेतून संपतात. सरकारने चळवळ दडपण्याचा प्रयत्न केला तर ते सरकारला महागात पडेल.

- राजू शेट्टी, माजी खासदार

Kolhapur Maratha Community
NCP Crisis : अजितदादा गटातून कोणी आपल्यात येण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना मागच्या बाकावर बसवा; शरद पवारांचे आदेश

मराठा व महाराष्ट्र नाते वेगळे आहे. मराठा समाज न्याय हक्कासाठी लढणारा आहे. विद्यमान राज्य व केंद्र सरकार भ्रमिष्ट झाले आहे. लोकशाहीने न्याय मागण्यासाठी येणाऱ्यांना मारहाण करता? मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी तत्काळ राजीमाना द्यावा. मराठा समाज ही घटना कधीच विसरणार नाही आणि निवडणुकीत धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.

- संजय पवार, जिल्हाप्रमुख, शिवसेना (ठाकरे गट)

कोणत्याही निशस्त्र आंदोलकांवर लाठीमार करणे, हे हिटलरशाहीचे लक्षण असून, आपली वाटचाल हुकुमशाहीकडे नेत असल्याचे सरकार दाखवून देत आहे. सरकारला मराठा आरक्षणाचा प्रश्‍न कधीच सोडवायचा नव्हता. सत्ताधारी पक्षांनी या प्रश्‍नाचे फक्त राजकारणच केले. मराठा आरक्षण मागणाऱ्या आंदोलकांवर दडपशाही करून सरकारने खरे रूप दाखवले आहे. त्याचा निषेध करतो.

- सतीश‍चंद्र कांबळे, जिल्हा सचिव, भाकप

Kolhapur Maratha Community
Gokul Dudh Sangh : 'गोकुळ' अध्यक्षांचा शौमिका महाडिकांवर पलटवार; 'महाडिकांनी फक्त राजकीय हेतूनंच तसं केलंय'

मराठा आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीमार केला. या कृत्याचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तीव्र शब्दांत धिक्कार करत आहे. देशभरातील सर्व प्रमुख विरोधी नेते इंडिया आघाडीच्या बैठकीला महाराष्ट्रात हजर असताना आंदोलकांवर झालेला हल्ला म्हणजे राज्य सरकार कुणालाच जुमानत नसल्याचे व विरोध करणाऱ्यांना चिरडून काढणार असल्याचा संदेश देत आहे. राज्य सरकारचा हा दृष्टीकोन निषेधार्ह आहे.

- डॉ. उदय नारकर, सचिव, माकप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com