बेवकूफ, जाहील, तू कोणाची नोकरी करत आहेस ? : जावेद अख्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

javed akhtar criticism on waris pathan

वारिस पठाण यांचे वक्तव्य मुर्खतेचे , बालिशपणाचे आणि एकतेला बाधा पोहचवणारे आहे, असे मत प्रसिद्ध कवी विचारवंत जावेद अख्तर यांनी व्यक्त केले आहे.

बेवकूफ, जाहील, तू कोणाची नोकरी करत आहेस ? : जावेद अख्तर

कोल्हापूर - वारिस पठाण यांचे वक्तव्य मुर्खतेचे , बालिशपणाचे आणि एकतेला बाधा पोहचवणारे आहे, असे मत प्रसिद्ध कवी विचारवंत जावेद अख्तर यांनी व्यक्त केले आहे. ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित गोविंद पानसरे स्मृती जागर सभेत जावेद अख्तर आणि महात्मा गांधी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ तुषार गांधी  यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जावेद अख्तर बोलत होते. 

पुढे बोलताना ते म्हणाले, वारीस पठान यांचे १५ कोटींचे वक्तव्य हे मुर्खतेचे आणि नालायकपणाचे असून एकतेला, अखंडतेला बाधा पोहचवणारे आहे. १५ कोटी मुस्लिमांचा ठेका फक्त एमआयएमकडे नाही. जे जिनाने मुस्लिम लिगच्या माध्यमातून राजकारण केले. तेच एमआयएम करत आहे. एमआयएमच्या नेत्यांची अशी वादग्रस्त वक्तव्ये भाजपच्या उद्दिष्ठांना मदत करणारी आहेत. भारतातल्या १५ कोटी मुस्लिम समाजाला ग्रुहीत धरण्याचे काम एमआयएम सारख्या पक्षाने करु नये, असे आवाहन जावेद अख्तर यांनी यावेळी केले. 

हे पण वाचा - शेतकरी कर्जमाफीची यादी या तारखेला प्रसिद्ध...

या सभेला  डॉ.मेघा पानसरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

Web Title: Javed Akhtar Criticism Waris Pathan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..