जयसिंगपुर : विद्यार्थ्यांना दूषित पाण्याचा पुरवठा प्रकरणी मुख्याध्यापक धारेवर

शिरोळ पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी दिपक कामत यांनी शनिवारी (ता.२२) शहरातील विविध शाळांना अचानक भेटी देत स्वच्छतेची पाहणी केली.
Uncleaned-Water
Uncleaned-Watersakal
Summary

शिरोळ पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी दिपक कामत यांनी शनिवारी (ता.२२) शहरातील विविध शाळांना अचानक भेटी देत स्वच्छतेची पाहणी केली.

जयसिंगपूर - शिरोळ पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी दिपक कामत यांनी शनिवारी (ता. २२) शहरातील विविध शाळांना (School) अचानक भेटी देत स्वच्छतेची (Cleaning) पाहणी केली. काही शाळांमधील पिण्याच्या पाण्याच्या (Drinkign Water) टाक्या अस्वच्छ असल्याचा प्रकार उघडकीस आल्याने श्री कामत यांनी मुख्याध्यापकांचा चांगलाच समाचार घेतला. याबाबत त्यांनी शेरेबुकात नोंद करून यापुढे सातत्याने शहरातील शाळांची तपासणी करण्याचा इशारा दिला.

मंगळवारपासून सुरू होणाऱ्या शाळांच्या पूर्वतयारीसाठी श्री कामत यांनी शनिवारी अचानक शहरातील विविध शाळांना भेटी दिल्या. पिण्याच्या पाण्याच्या टाक्या दहा महिन्यापासून स्वच्छ केल्या नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावरून त्यांनी मुख्याध्यापकांना जाब विचारला. काही शाळांमध्ये जलशुद्धीकरण यंत्रणा बसविण्याच्या त्यांनी सूचना केल्या.

Uncleaned-Water
कोल्हापूर : पानगळीचा कालावधी लांबला ; उपनरांतील झाडे अजूनही हिरवीकंच

पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, स्वच्छतागृहांची पाहणी करून श्री कामत यांनी मुख्याध्यापकांना सूचना केल्या. काही शाळांमध्ये थेट नळाचे पाणी पिण्यासाठी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले गेले आहे. याठिकाणी जलशुद्धीकरण यंत्रणा बसविण्याचे आदेश दिले. तसेच आरटीई ऍक्टनुसार शाळेतील शाळांमधील भौतिक सुविधांची ही त्यांनी माहिती घेतली.

मूल्यमापनाच्या बाबी तपासून नोंदी कशा ठेवाव्यात, ऑनलाइन शिक्षणाचे रेकॉर्ड कसे असावे, मूल्यमापनाचा आराखडा कसा तयार करावा याबाबतीत त्यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. विद्यार्थी शाळेचा पायाभूत घटक आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार शाळांनी करू नये अशा सूचना देऊन आधारकार्ड अपडेटबाबत माहिती घेतली. पटानुसार विद्यार्थी संख्या आहे का याचीही त्यांनी पाहणी केली.

जिल्हाधिकाऱ्यांच्या प्राप्त सूचनांची अंमलबजावणी करून मंगळवारपासून शाळा सुरू होणार आहेत. ज्या शहरात अथवा गावामध्ये लोकसंख्येच्या एक टक्का कोरोना रुग्ण आहेत किंवा रूग्णांची संख्या शंभराहून अधिक आहे अशा गावांमधील शाळा बंद करण्याबाबत निर्णय होऊ शकतो.

Uncleaned-Water
कोल्हापूर - जिल्ह्यातील शाळा मंगळवारपासून सुरू होणार

मात्र सध्या शिरोळ तालुक्यामध्ये एकाही गावात अशी स्थिती नाही असे स्पष्ट करून ते म्हणाले, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन शाळांनी नियोजन केले पाहिजे. विद्यार्थ्यांचे थर्मल टेस्टिंग, त्यांच्यामधील अंतर आणि स्वच्छतेबद्दल प्राधान्याने लक्ष दिले जावे अशा सूचनाही त्यांनी केल्या.

जयसिंगपूर शहरातील शाळांमधील भौतिक सुविधा आणि स्वच्छतेबाबत अचानक पाहणी केली. शहरातील सर्व शाळांना याबाबत लेखी कळवले आहे. यापुढेही सातत्याने शाळांमध्ये स्वच्छतेची पाहणी करून सूचना दिल्या जातील. यामध्ये हायगय करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई करू.

- दिपक कामत (गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती शिरोळ)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com