Crime News : मूळ कसणाऱ्यांनी ठेवले पोटकूळ

देवस्थानसमोर आव्हान; जमिनी तपासण्यासाठी विशेष यंत्रणेची गरज
Jotiba Temple Land Sale Case Need for special system to check land
Jotiba Temple Land Sale Case Need for special system to check landsakal

कोल्हापूर : जोतिबा देवस्थानच्या जमिनी ज्यांच्याकडे कसायला आहेत, त्यापैकी अनेकांनी पोटकूळ ठेवले असल्याची माहिती समोर येत आहे. अनेक बड्या धेंड्यांनी या जमिनीवर बेकायदेशीर आणि कागदपत्रांशिवाय डल्ला मारल्याची चर्चा आहे.

याची व्याप्ती मोठी असून, देवस्थान समिती किंवा जिल्हा प्रशासनाने यावर एक समिती नियुक्त करून याची चौकशी केल्यास यामध्ये अनेकांचे पितळ उघडे पडणार आहे. जोतिबा डोंगरासह मंदिर परिसरातील गावांचे प्राधिकरण व्हावे,

प्राधिकरणाच्या माध्यमातून या गावांचा विकास करावा, यासाठी जोतिबा देवस्थानच्या जमिनी कोठे आहेत, त्या कोणाकोणाच्या ताब्यात आहेत, याची माहिती घेताना जोतिबा देवस्थानची कर्नाटक, कोकण, सातारा येथील बहुतांश जमिनींची कसणाऱ्यांनीच इतरांना विक्री केली आहे,

तसेच ज्यांना खंडाने जमीन दिली आहे, त्यांनीही जमीन विक्रीचा गैरकारभार केल्याचे समोर येत आहे. आता जिल्हा प्रशासन आणि पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती यावर ठोस भूमिका घेऊन या जमिनींचा शोध घेऊन कारवाई करणार आहे.

मात्र, सध्या देवस्थान समितीकडे अशा जमिनींची माहिती घेण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याचे चित्र आहे. याशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणात असणाऱ्या या जमिनींच्या नोंदी, तपासणी, तसेच सध्या जिल्ह्यातही जोतिबा देवस्थानच्या जमिनी ज्यांच्याकडे आहेत ते स्वत: कसतात की त्यांनी पोटकूळ ठेवले आहे, याची चौकशी करावी लागणार आहे.

ज्या जमिनी देवस्थानच्या आहेत आणि ज्यांना कसायला दिल्या आहेत, त्या शेतातील पीक त्यांच्याच नावावर असायला पाहिजे. पण, अनेक ठिकाणी तसे दिसून येत नाही याची चर्चा होत आहे. देवस्थान समिती, जिल्हा प्रशासनास स्वतंत्र समिती नियुक्त करूनच जमिनींची तपासणी करावी लागणार आहे. तशी यंत्रणाही लवकरच गतिमान होणार असल्याची माहिती आहे.

सर्व जमिनींचीही माहिती द्यावी लागणार

जोतिबा मंदिर परिसरातील गावांचा समावेश असणारे प्राधिकरण व्हावे, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्ताव मागितला आहे. हा प्रस्ताव देत असताना जोतिबा देवस्थानच्या सर्व जमिनींचीही माहिती द्यावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर जोतिबा मंदिराच्या सर्व जमिनीची चौकशी करून त्याची माहिती दिली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com