कोडोली : जोतिबा डोंगरावर झालेला (Jyotiba Dongar Killing Case) खुनामधील संशयित महिला आरोपीला सोमवारी रात्री कोडोली पोलिसांनी (Kodoli Police) अटक केली. सुमित्रा महादेव बोरगावे (वय ४२) (रा. मोळे ता. कागवाड जि. बेळगाव कर्नाटक) असे तिचे नाव असून, तिघा आरोपींना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.