कागल : दूधगंगेत आढळली सात फुटांची मगर

वंदूर येथे मासेमारीच्या जाळ्यात अडकली; मूळ अधिवासात सोडण्यात यश
kolhapur
kolhapursakal

कागल : वंदूर येथे दूधगंगा नदीत इंडियन क्रोकोडाइल जातीची मादी मगर पकडण्यात आली. कागल पोलिस व सह्याद्री डिजास्टर रेस्क्यू फोर्स (करनूर) यांनी या मगरीला अधिवासात सोडून दिले. या मगरीचे वय चार ते पाच वर्षे असून, तिची लांबी सात ते आठ फूट आहे.

दूधगंगा नदीत मासे पकडण्यासाठी अज्ञाताने जाळे लावले होते. त्या जाळ्यात ही मगर सापडली व धडपडू लागली. त्यानंतर बळीराम इंगळे, विशाल पाटील, कृष्णात बागणे, अतुल घाटगे, सूरज इंगळे, सोन्या पाटील यांनी त्या मगरीस पकडून बाहेर काढले. या वेळी कागलच्या उपनिरीक्षक मोनिका खडके, रणजित कांबळे, राजीव सावंत, बी. बी. रानगे, प्रदीप पाटील, कृष्णा पाटील यांनी तसेच सह्याद्री डिझास्टर रेस्क्यू फोर्सचे अनिल ढोले, विनय कोरे, रोहित जाधव, हर्षद पाटील, सुमित चौगुले, सम्मेद चौगुले या जवानांनी नदीकाठी धाव घेतली.

कापशी वनपरिक्षेत्र वनपाल बळवंत शिंदे यांच्याशी मोबाईल वरून संपर्क साधला. त्यांच्या सांगण्यावरून तिला पोलिसांच्या व रेस्क्यू फोर्स जवानांच्या साथीने

अधिवासात सोडले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com