नदीत बुडून दोन युवकांचा दुर्दैवी अंत; 'गणेश'चं अभियंता होण्याचं स्वप्न राहिलं अधुरं, मुलासाठी आई-वडिलांनी कष्ट घेतलं, पण..

काळम्मावाडी धरण (Kalammawadi Dam) परिसरात गणेश कदमचा बुडून मृत्यू झाला.
Dudhganga River Kalammawadi Dam
Dudhganga River Kalammawadi Damesakal
Summary

गणेश कदम दहावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर अलीकडेच बारावीही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला होता.

निपाणी : वर्षा पर्यटनासाठी निपाणीतील काही तरुण खासगी वाहनाने काळम्मावाडी (ता. राधानगरी) येथील धरण (Kalammawadi Dam) परिसरात गेले होते. पण, एक जण बुडत असताना वाचविण्यासाठी गेलेल्या तरुणांचाही बुडून मृत्यू झाला. गणेश चंद्रकांत कदम (वय १८) आणि प्रतीक पाटील (वय २२, रा. आंदोलननगर निपाणी) अशी त्यांची नावे आहेत. या घटनेमुळे गणेशचे अभियंता होण्याचे स्वप्न अधुरे राहिले. या दोघांच्या मृत्यूने निपाणी हळहळली.

Dudhganga River Kalammawadi Dam
'गणेश, आता आम्ही कोणाकडं बघायचं..'; आईनं फोडला टाहो, पर्यटनासाठी गेलेल्या तरुणांचा नदीत बुडून दुर्दैवी अंत

गणेश कदम दहावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर अलीकडेच बारावीही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला होता. वडील किराणा दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत. मुलगा शिक्षण घेऊन पुढे नोकरी करेल, या आशेवर आई-वडील कष्ट करत होते. मुलाला अभियंता (Engineer) करण्यासाठी आई-वडिलांनी पै अन् पै गोळा करून गणेशला अभियंता करण्यासाठी काही दिवसांपूर्वी कोल्हापूर येथील एका नामांकित महाविद्यालयात प्रवेश निश्चित केला होता.

त्याची सर्व तयारी झाली असताना काळाने त्याच्यावर घाला घातला. त्यामुळे कदम कुटुंबीयांचा आधार नाहीसा झाला आहे. दोघांच्या मृत्यूमुळे निपाणी शहरासह आंदोलन नगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गणेश याच्या मागे आई, वडील, लहान भाऊ असा परिवार आहे.

Dudhganga River Kalammawadi Dam
गोविंद पानसरेंच्या खुनात सनातन संस्थेचा सहभाग? ATS च्या तपासावर पानसरे कुटुंबाची नाराजी, 68 पानी लेखी निवेदन सादर

प्रतीकसोबत कुटुंबाचा आधार गेला

आंदोलन नगरातील प्रतीक पाटील याच्या घरातील परिस्थिती बेताची आहे. वडिलांची शहरात चहाची टपरी आहे. वडिलांना आर्थिक हातभार लावावा, या उद्देशाने काही वर्षांपूर्वी प्रतीकने चारचाकी वाहन घेतले होते. त्याद्वारे भाडे करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावत होता. वडिलांची चहा टपरी आणि त्याच्या व्यवसायामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. वडिलांनंतर तोच घरचा कर्ता होता. पण, आता त्याच्या मृत्यूमुळे वडिलांचा व पर्यायाने कुटुंबाचा आधार गेला आहे. त्याच्या मागे आई-वडील, लहान भाऊ, बहीण असा परिवार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com