esakal | खासबाग मैदानात रंगणार यंदाच्या कामगार केसरी कुस्ती स्पर्धा....
sakal

बोलून बातमी शोधा

kamgar Kesari Wrestling Competition to be held in Khasbagh Maidan kolhapur

खासबाग मैदानात रंगणार यंदाच्या कामगार केसरी कुस्ती स्पर्धा....

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - कामगार विभागांतर्गत महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे मंगळवारी (ता. २५) ‘कामगार केसरी’ व ‘कामगार कुमार केसरी’ कुस्ती स्पर्धा खासबाग मैदानात होणार आहेत. विजेत्यांना अनुक्रमे ७५ हजार व ५१ हजार रुपये व गदा असे बक्षीस आहे. कामगार कल्याण निधी अधिनियमच्या अंतर्गत येणाऱ्या आस्थापनेतील कामगार व त्यांच्या पाल्यांसाठी या स्पर्धा होतील. 

खासबाग मैदानात आयोजन; कुमार गटातही होणार स्‍पर्धा

छत्रपती शाहू कुस्ती मैदान खासबाग, कोल्हापूर येथे सोमवारी (ता. २४) सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत वजने घेण्यात येतील. दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता व सायंकाळी ४ वाजता कुस्त्या होतील. कुस्त्या मॅटवर होतील.

हे आहेत स्पर्धेचे नियम 

जिल्हा तालीम संघाच्या सहकार्याने व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या नियमाप्रमाणे स्पर्धा होतील. स्पर्धा बाद पद्धतीने घेण्यात येतील. कामगार केसरी स्पर्धेतील स्पर्धक हा स्वतः कामगार असावा आणि तो ज्या आस्थापनेत काम करतो, तेथील व्यवस्थापनांकडून तो स्वतः कामगार असल्याचे प्रमाणपत्र (सर्टिफिकेट) त्याला सादर करावे लागेल. स्पर्धेसाठी येताना स्वतःचे ओळखपत्र आणावे.

कुमार केसरी स्पर्धेतील स्पर्धकांनी पालक ज्या आस्थापनेत काम करतात, ते कामगार कल्याणकडे भरलेल्या शुल्काची पावती व आधार कार्ड, व्यवस्थापनेचा दाखला, आधार कार्डाची साक्षांकित प्रत जोडावी. कुस्त्या मॅटवर होणार असल्याने स्पर्धकांनी नियमाप्रमाणे पायामध्ये रेसलिंग शुज, तसेच स्पर्धकास काॅश्‍युम वापरणे बंधनकारक आहे. 

बक्षिसे अशी....

कामगार केसरी स्पर्धा :   

  •  प्रथम - ७० हजार व फिरती गदा
  •  व्दितीय - ५० हजार,  
  • तृतीय ३५ हजार,
  •  उत्तेजनार्थ - २० हजार. 

कुमार केसरी -  (५७ किलो वजनी गटापर्यंत)

  •  प्रथम - ५१ (फिरती गदा), 
  •  व्दितीय - ३५ हजार,
  •  तृतीय - २० हजार 
  • उत्तेजनार्थ - १० हजार.
loading image