भविष्यात कन्नड व्यावसायिक अडचणीत येतील; शिवसेनेचा इशारा

कन्नडिगांचा लाल पिवळ्या रंगाचा ध्वजाची होळी करण्यात आली
Shivsena
ShivsenaShivsena
Updated on: 

कोल्हापूर : कन्नड गुंडानी यापुढे सीमाभागातील एकाही मराठी माणसास हात लावल्यास भविष्यात कोल्हापूर जिल्ह्यातील कन्नड व्यावसायिकही भविष्यात अडचणीत येतील याचे भान कन्नडिगांनी ठेवावे, असा इशारा जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज देण्यात आला.

महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दिपक दळवी यांना कन्नडिगांना काळे फासल्याच्या निषेधार्थ शिवसेनेने आज बिंदू चौक येथे निदर्शने केली. दळवी यांना काळे फासणाऱ्या कानडी गुंडांचा धिक्कार असो, कन्नडिगांचे करायचे काय खाली ढोके वर पाय, काळे फासणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. हा आवाज कोणाचा शिवसेनेचा. जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी कन्नडिगांचा लाल पिवळ्या रंगाचा ध्वजाची होळी करण्यात आली.

Shivsena
सर्वात यशस्वी ODI कॅप्टन कोण, सौरभ की विराट?

जिल्हाप्रमूख संजय पवार म्हणाले. सीमाबांधवावर गेल्या अनेक वर्षापासून अन्याय सुरू आहे. शिवसेना त्यांच्या कायमछी पाठिशी राहिली आहे. आता थेट मराठी माणसावर हात टाकण्याचा प्रयत्न होत आहे. दिपक दळवी यांच्या शाई फेकण्याचा प्रकार निंदनीय आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही कन्नड व्यावसायिक आहेत हे गुडांनी भान ठेवावे, भविष्यात एकाही मराठी माणसाच्या दिशेने चाल करून गेलात तर येथील कन्नड व्यावसायिकांनीही त्याची ढळ बसेल हे ध्यानात ठेवा.

यावेळी जिल्हाप्रमूख विजय देवणे, विनोद खोत, अवधूत साळोखे, बबलू शेख. सुशांत देसाई,दिलीप देसाई धनाजी जाधव, कमला पाटील, गीतांजली गायकवाड, सुजित चव्हाण, दिलीप देसाई, विराज पाटील आदि निर्दशऩात सहभागी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Gokul Milk Union five nominated directors ordinance
Kolhapur Municipal Corporation approves outsourcing of employees to address staff shortages across departments.
Satej Patil statement on Gokul chairman election
Gokul Milk Union Ordinance